चेहऱ्यावरील वांग, काळे डाग, तीळ आणि चामखीळ, चुटकीत घालवा…

मानवी शरीरात तोंडावर ओठांभोवती येणाऱ्या तिळामुळे सौंदर्य वाढण्यास मदत होते हे आपण अनेकदा पहिले असेल. मात्र हेच तीळ एखाद्याच्या कुरुपपणाचे कारणही असू शकते. चेहऱ्यावर येणारे मोठे मोठे आणि फुगणारे मस्से हे चेहऱ्याच्या सौंदर्यास बाधक ठरतात.

आरोग्य विज्ञानामध्ये सांगितल्याप्रमाणे तीळ तयार होण्याचे एकमेव कारण म्हणजे रंगद्रव्य मेलेनिन आहे. मानवी शरीरात मेलेनिन नावाचा एक प्रकारचा रंगद्रव्य आहे. जे शरीराच्या वेगवेगळ्या भागातील पेशींद्वारे तयार केले जाते. मेलेनिन हे कोणत्याही व्यक्तीच्या शरीरातील विविध प्रकारच्या रंगांसाठी जबाबदार असल्याचे मानले जाते.

आपण याला ‘मेलानोसाइट्स’ म्हणून ओळखतो. सामान्यतः मेलॅनोसाइट्सची सूर्याकडून उपलब्ध प्रकाशासह प्रक्रिया झाल्यानंतर त्याचा परिणाम म्हणून शरीरावर मोल्स तयार होतात. या व्यतिरिक्त, गरोदरपणात आपल्या हार्मोन्स मध्ये भरपूर बदल झाल्यामुळे, मधुमेह आणि आनुवंशिकता इत्यादी मुळे शरीरात मोल्स दिसतात. चेहऱ्यावरील मोल्स किंवा मस्सा आपण घरच्या घरी एका उपायाद्वारे करू शकतो.

या उपायासाठी फक्त एका लसणाची गरज आहे. या लसणाच्या ४-५ पाकळ्या सोलून घ्याव्यात आणि पाकळ्यांचे बारीक बारीक तुकडे करावेत. यानंतर हे लसणाचे तुकडे तीळ आणि मस्स्यांवर ठेवावे आणि त्याला मलमपट्टी केल्यासारखे बांधून घ्यावे. ही पट्टी आपल्याला ४-५ तासानंतर काढायची आहे. यानंतर पट्टी काढून हा भाग स्वच्छ पाण्यानी धुवून घ्यावा. असे दिवसातून दोन वेळेस केल्यास मस्सा आणि मोल निघून जातील.

चामखीळ आणि मोल काढण्यासाठी आपण कांदा आणि लसणाचा देखील वापर करू शकता. कांदा आणि लसणाला चांगले बारीक करून त्यांचा रस एका वाटीत घ्यावा. या दोघांचा रस मिसळा आणि कापसाच्या बॉलच्या मदतीने तीळ किंवा मस्सावर १५ मिनिटांसाठी लावा. यानंतर चेहरा किंवा त्वचा स्वच्छ पाण्याने धुवावा. हा उपाय केल्यास काही दिवसांतच आपल्याला फरक दिसून येईल.

तीळ काढण्यासाठी आपण केळीच्या सालीचा देखील उपयोग करू शकतो. केळीच्या सालीचा एक छोटासा भाग कापून तीळावर पट्टीच्या साह्याने लावून टाकावा. रात्री झोपताना ही पट्टी लावावी आणि सकाळी उठल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी. यानंतर चेहऱ्यावरील तीळ काही दिवसांतच दिसेनासे होतील. हा तीळ काढण्याचा हा सर्वात सोपा उपाय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *