दह्यासोबत हे ‘तीन’ पदार्थ खात असल्यास आत्ताच सावध व्हा; शरीराला होऊ शकते विषबाधा

दही खाणे हे शरीरासाठी अत्यंत चांगले मानले जाते. दही आपल्या शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे देखील देत असते. दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, रिबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी ६ आणि व्हिटॅमिन बी १२ सारखे पोषक घटक असतात जे शरीराला अनेक रोगांपासून दूर ठेवण्यास मदत करतात.

वजन कमी करण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठतेची समस्या टाळण्यास देखील दही आपल्याला मदत करत असते. दररोज दही खाल्ल्याने शरीर डिटॉक्सिफाइड होते. एवढेच नाही तर जर तुम्ही थकलेले, कमकुवत आणि ऊर्जेच्या बाबतीत कमी असाल तर दही या सगळ्यांमध्ये तुम्हाला चांगली मदत करते. खरं तर, बर्‍याच लोकांना काहीतरी खाल्यानंतर किंवा इतर काही गोष्टींसोबत दही खाण्याची सवय असते.

जर तुम्हीही चव वाढवण्यासाठी हे करत असाल तर हे कदापि करू नका. असे केल्याने तुमच्या शरीराला विषबाधा होऊ शकते, ज्यामुळे तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वेगाने कमकुवत होऊ शकते. खाली दिलेल्या ३ गोष्टींसोबत दही खाल्यास आपल्या आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात.

मासे आणि दही दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात, परंतु या दोघांना एकत्र घेणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जर तुम्ही मासे आणि दही एकत्र घेतले तर त्याचा तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. एवढेच नाही तर यामुळे अनेक आजार देखील होऊ शकतात.

प्रत्येकाला उन्हाळ्यात आंबा खायला आवडतो. आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते, पण चुकून आंबा आणि दही एकत्रितपणे खाऊ नका. वास्तविक, दही आणि आंब्याची वेगवेगळी चव असते जी शरीराला हानी पोहोचवू शकते.

दूध आणि दही हे दोन्ही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. दोन्ही डेअरी उत्पादने आहेत. परंतु आयुर्वेदाने दोन्ही एकत्रपणे न वापरण्याची शिफारस केली आहे. असे मानले जाते की हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने अतिसार, गॅस आणि पोटदुखी सारख्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे हे पदार्थ एकत्र खाणे टाळा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *