Thursday, January 27
Shadow

पित्त कोणत्याही प्रकारचे असो, मुळासह होणार गायब, आयुष्यात पित्ताचा आणि उष्णतेचा त्रास होणार पूर्णतः कमी, गोळ्या बंद

आपल्यातील अनेकांना पित्त, आम्ल्पित्त, अंगावर पित्ताचे फोड येणे, अंगाला खाज सुटणे अशा समस्या असतात. पित्तामुळे आपल्याला काही खाण्याच्या गोष्टींना वर्ज्य करावे लागते अन्यथा आपल्याला उलट्या, मळमळ होणे अशा समस्या देखील जाणवतात. पित्ताचे चार प्रकार असतात. पित्त हे किंचित तैलीय, भेदक, उष्ण, हलके, सुगंधी, प्रवाही आणि जलरूपी असते.

चहा, बदलते खानपान, जास्त बाहेरचे खाणे आणि इतरही काही गोष्टींमुळे आपल्याला पित्ताचा त्रास जाणवत असतो. पित्तासाठी आपण कितीही गोळ्या, औषधे घेतली तरी देखील कधीकधी पित्ताचा त्रास आपला कमी होत नाही. तर मित्रांनो पित्ताच्या आजरासाठी आपण काही घरगुती आयुर्वेदिक उपाय करून पित्ताचा समूळ नायनाट करू शकतो.

त्यासाठी आपल्याला जास्वंदीची पाने घ्यायची आहे. गणपती बाप्पांचे आवडते फुल म्हणजे जास्वंदी असते. मित्रांनो जास्वंदीची पाने ही आयुर्वेदात अत्यंत महत्वाची समजली जातात. आपल्या घराच्या बगिच्यात किंवा आसपास आपल्याला जास्वंदीची पाने अगदी सहज उपलब्ध होतात. जास्वंदीची पाने पित्त नियंत्रणासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. या पानांमुळे शरीरातील उष्णता देखील कमी होते.

यासोबत आपल्याला दुसरा महत्वाचा घटक घ्यायचा आहे तो म्हणजे खडीसाखर. खडीसाखर आपल्याला एक छोटा खडा इतकी घ्यायची आहे. शक्यतो आपल्याला फुल आलेली जास्वंदीची पाने घ्यायची आहेत.

आपल्याला जास्वंदीची पाने चांगली धुवून घ्यायची आहेत. त्यानंतर आपल्याला एक खडा खडीसाखरेचा या पानांमध्ये गुंडाळून घ्यायचा आहे. या उपायामुळे शीतपित्त, आम्ल्पित्त हे पूर्णतः कमी होणार आहे आणि नियमित उपाय केल्यानंतर आपली पित्ताची समस्या कायमची बरी होणार आहे.

आपल्याला हे चावून चावून खायचं आहे. हे खाल्यानंतर जी लाळ तयार होणार आहे ती आपल्याला गिळायची आहे आणि तुम्ही ती थुंकली तरी चालणार आहे. हा उपाय आपल्याला सात दिवसांसाठी करायचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *