Thursday, January 27
Shadow

रिकाम्या पोटी काळी मिरी खाण्याचे फायदे, जाणून घेतलेत तर पायाखालची जमीन सरकेल…

नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला मसल्यांचा राजा असलेल्या काळी मिरी याच्या काही औषधी गुणांबद्दल खूपच चांगली माहिती सांगणार आहे. काळी मिरी ज्याला आपण इंग्लिशमध्ये “ब्लॅक पिपर” म्हणतो. आयुर्वेदात काळ्या मिरीचे खूप जास्त महत्व आहे. आपली रोगप्रतिकारशक्ति वाढवते, आपली रोगप्रतिकारशक्ति मजबूत करते. तर कोणत्या प्रकारे व कोणत्या आजारासाठी व कधी घ्यायचे आहे ती सगळी माहिती मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे.

३ ते ४ काळ्या मिरीचे सेवन आपण जरूर केले पाहिजे खास करून थंडीच्या दिवसात. आता थंडीचा ऋतु सुरू झालाच आहे. ३ ते ४ काळ्या मिरीचे सेवन जरूर करा. सकाळी घ्या, रिकाम्या पोटी घ्या पण गरम पाण्याबरोबर घ्या. थंड पाणी पिऊ नका. लहान सहान आजार म्हणजेच सर्दी, खोकला, ताप आपल्याला होणार नाही, काळी मिरी इतकी फायदेमंद आहे आपल्यासाठी. विटामीन सी भरपूर प्रमाणात असते, त्याचबरोबर पोषक तत्वे असतात.

काळी मिरी अॅंटी-ओकसिडेंटने परिपूर्ण असल्यामुळे, वात, पित्त, कफ या ३ गोष्टी ज्या आपल्या शरीरात आजार पसरवतात, याला संतुलित करते काळी मिरी. ज्यांना खूप जास्त प्रमाणात पित्ताचा त्रास आहे त्यांनी काळी मिरीचे सेवन कमी करा कारण काळी मिरी प्रकृतीने गरम असते. मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसात मात्र तुम्ही १ किंवा २ काळ्या मिरीचे सेवन करा पण थंडीच्या दिवसात ३ ते ४ काळ्या मिरीचे सेवन सहजपणे तुम्ही करू शकता.

बरेच लोक आवाजात मधुरपणा, गोडवा येण्यासाठी पण काळ्या मिरीचे सेवन करतात. काळ्या मिरीची पाऊडर तव्यावर थोडे शेकून घेऊन तुम्ही बनवू शकता. मार्केटमध्ये पण याची पाऊडर मिळते पण घरीच करणे योग्य आहे. काळ्या मिरीला आपल्या आहारात जरूर समाविष्ट करा. खलबत्त्यात टाकून तुम्ही कुटून घेऊ शकता. मधाबरोबर मिसळून खाल्ली तर सर्दी, खोकला, अंगदुखी यापासून आराम मिळेल.

काळी मिरीच्या सेवनाने आपली स्मरणशक्ती चांगली होते. ज्यांना विसरायची सवय आहे त्यांनी ३ ते ४ काळ्या मिरीचे सेवन जरूर करावे. दातांमध्ये कीड असेल, पायरियाचा त्रास असेल, त्यांनी काळ्या मिरी व लवंग कुठून जिथे वेदना त्यामध्ये लावावे, कीड मरेल व दातांच्या वेदना थांबतील. गरम पाण्याबरोबरच काळ्या मिरीचे सेवन करावे.

काळी मिरी शरीरातील विषारी तत्वे बाहेर टाकते. सौंदर्य प्रसाधंनांमध्ये याचा उपयोग केला जातो. आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. २ महिन्याच्या पेक्षा जास्त पाऊडर तयार करून ठेवू नका. ताजी वाटून घ्या. आले, लवंग, काळी मिरी हे पाण्यात घालून उकळा व ते पाणी सकाळी प्या. वजन कमी होईल, आपले पचन सुधारेल, चरबी तयार होणार नाही. काळ्या मिरीचे सेवन केल्यामुळे आपल्या डोळ्याची दृष्टी सुधारते.

अॅंटी-बक्टेरियल गुणधर्म असतात काळ्या मिरीमध्ये. जे लोक अशक्त असतात, त्यांनी याचे सेवन जरूर करावे. थकवा, हाडांचे दुखणे यामध्ये खूपच फायदेशीर आहे काळ्या मिरीचे सेवन. गरम दुधात पण तुम्ही घेऊ शकता. हा फक्त मसाला नाही तर औषधांचे भांडार आहे. आमची माहिती आवडली तर लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *