व्हायरल तापाची ‘ही’ आहेत लक्षणे ; व्हायरल ताप असल्यास करा ‘हे’ चार उपाय

ताप हा सामान्य आजारांपैकी एक आहे. तसेच सध्याच्या काळात पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात ताप येणे ही एक सामान्य गोष्ट आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करणे अजिबात योग्य नाही. तापावर वेळेवर उपचार करणे आवश्यक आहे, अन्यथा हा लहान रोग देखील भयंकर रूप धारण करू शकतो. पावसाळ्यात ताप येणे ही गोष्ट अजिबात दुर्लक्ष करण्यासारखी कारण पावसाळ्यात तापाबरोबरच आपल्याला सर्दी आणि खोकला देखील होत असतो.

पावसाळ्याच्या काळात अनेकदा असे दिसून येते की लोकांना विषाणूजन्य तापाची जास्त शक्यता असते आणि बहुतेक लोक विषाणूजन्य तापाचे बळी ठरतात. तथापि, हे फार गंभीर नाही आणि घाबरून जाण्याची किंवा त्याबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही. मात्र ताप लवकरात लवकर बरा होणे गरजेचे असते.

कोणत्याही आजारावर किंवा रोगावर चर्चा करण्यापूर्वी, त्याच्या लक्षणांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. याविषयी डॉक्टरांनी काही लक्षणे नमूद केलेली आहेत जी आपण लक्षात घेतली पाहिजे.

विषाणूजन्य तापाची लक्षणे
१. घशात दुखणे, २. डोकेदुखी ३. सांधे दुखी , ४. डोके गरम होणे ,५. अचानक येणारा ताप जो वेळोवेळी येतो आणि जातो, ६. खोकला , ७. डोळे लाल होणे
८. उलट्या किंवा मळमळ, ९. खूप थकलेला, १०.अतिसार

जर तुम्हाला वर नमूद केलेल्या १० लक्षणांपैकी कोणतीही लक्षणे दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करता त्वरित उपचार करा. ताप असलेल्या रुग्णाला स्वतंत्र खोली द्यावी. घरातील सदस्यांपासून आवश्यक अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा. अशा परिस्थितीत, व्हायरल ताप इतर कोणत्याही सदस्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. त्यांनतर त्यावर योग्य उपचार घेणे गरजेचे आहे.

यासाठी आता तुम्ही घरगुती उपचार देखील करू शकता. तुळशीचा काढा, तुळशीचा चहा आणि तुळशीचे थेंब देखील कोमट पाण्याने व्हायरल तापात फायदेशीर आहेत. जास्त पाणी देखील आपण व्हायरल ताप असल्यास पिणे गरजेचे आहे.

व्हायरल ताप असल्यास आपण फळांचा जूस पिल्यास आपल्याला आराम मिळतो. त्यातच आपण हंगामी फळे खाल्यास आणखी फायदेशीर आहे. जर तुम्ही चहा पित असाल तर आल्याचा चहा पिणे शरीरासाठी चांगले आहे. आल्याचा चहा पिल्यास आपल्याला सर्दी आणि खोकल्यामध्ये देखील चांगला फरक पडतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *