सी जीवनसत्वाच्या आहारातील अधिक समावेशामुळे होतात ‘हे’ भयानक त्रास; सी जीवनसत्वांबद्दल ‘असं’ काही वाचलं तर घेतालं टेन्शन

जगभरात कोरोना महामारी आली आणि लोकांना आरोग्याबाबत विशेष जागरूक करण्याचे काम महामारीने केले. आपण सर्वजण सध्या आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर देत आहोत. या कारणामुळेच आता लोकांनी आपल्या दैनंदिन जीवनात निरोगी आहार, योगा आणि हलका व्यायाम यासारख्या गोष्टींचा समावेश केला आहे.

सध्या व्हिटॅमिन सीच्या गोळ्या घ्या असा सल्ला अनेकांकडून आपल्याला दिला जातो. नक्कीच व्हिटॅमिन सी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. मात्र लोकांना व्हिटॅमिन सीच्या गोळ्यांचे किती मात्रेत सेवन करायचे याबाबत काहीसे ज्ञान कमी असल्याने लोक त्याचा अतिरेक करताना दिसत आहेत. व्हिटॅमिन सीच्या गोळ्यांचा अतिरेक करणे हे आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकते.

व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात घेण्याचे तोटे खालीलप्रमाणे आहेत

१, छातीत जळजळ होणे
जर तुम्ही व्हिटॅमिन सी जास्त घेतले तर तुम्हाला छातीत जळजळ होऊ शकते. यामुळे छातीत खालच्या आणि वरच्या भागासह घशात जळजळ होऊ शकते.

२. पोटात जळणे
मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सीचे सेवन करणे आपल्या पोटासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे तुम्हाला जळजळ, पेटके, आणि पोटात दुखण्याची समस्या येऊ शकते. यासह फुशारकीच्या तक्रारी देखील असू शकतात.

३. उलट्या आणि अतिसार
जर तुम्ही जास्त प्रमाणात व्हिटॅमिन-सी पूरक आहार घेत असाल तर तुम्हाला अतिसाराची तक्रार होऊ शकते म्हणजे उलट्या आणि अतिसार. या व्यतिरिक्त, तुमचे पोट अस्वस्थ होऊ शकते. पोटातील समस्येमुळे तुम्हाला रात्री झोपण्यासही अडचण निर्माण होऊ शकते.

४. अस्वस्थता
जर व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात घेतले गेले तर मळमळ किंवा अस्वस्थ होण्याची समस्या निर्माण येऊ शकते.व्हिटॅमिन सीचे जास्त सेवन आपल्या शरीराला कसे नुकसान करू शकते म्हणून, नेहमी मर्यादेत व्हिटॅमिन सी घ्या. विशेषतः जर तुम्हाला कोणत्याही इतर समस्येसाठी व्हिटॅमिन सीच्या गोळ्या घेण्यास सांगितले असेल तर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *