Thursday, January 27
Shadow

हे तेल केसांसाठी संजीवनीच, केस इतके वाढतील की विंचरताना कंटाळा येईल, केसगळती थांबेल, डॉ. स्वागत तोडकर…

नमस्कार, आपल्या सर्वांचे स्वागत आहे. रात्री झोपताना हे तेल केसांना लावा, केस गळती थांबते व केस लांबसडक, मुलायम होतील की तुम्हाला स्वत:लाच त्यावर विश्वास बसणार नाही. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तिला केस गळती या समस्येस कधी ना कधी सामोरे जावे लागते.

तुमचे केस खूप गळत असतील, कमी वयात तुम्हाला टक्कल पडले असेल, किंवा तुमचे केस खूप रुक्ष असतील, केसांना अजिबात वाढ नसेल, केसांना चाई लागली असेल, किंवा केस अवेळी पांढरे झाले असतील अशा केसांच्या कोणत्याही समस्या असतील, तर हेयरगेन ऑइल वापरा तुमच्या सर्व समस्या मूळापासून समाप्त होतील इतके हे तेल प्रभावी आहे.

तुम्ही घरच्या घरी हे तेल तयार करू शकता. असे हे अत्यंत परिणामकारक तेल बनविण्यासाठी आपल्याला जो पहिला घटक लागणार आहे तो म्हणजे मोहरीचे तेल, ज्याला आपण मस्टर्ड ऑइल असे म्हणतो. मित्रांनो, हे आपल्याला कच्च्या घाणीचे तेल घेतले पाहिजे, ज्याला कोल्ड प्रेस ऑइल असे म्हणतात. सरसों का तेल किंवा कोल्ड प्रेस ऑइल असे तेल मिळाले तर ते नक्कीच वापरा.

पण तसे मिळाले नाही, तर तुमच्याकडे जे उपलब्ध असेल, ते मोहरीचे तेल तुम्ही घेऊ शकता. हे एक वेळच्या वापरासाठी ५० मिलि घ्यायचे आहे. मोहरी तेल हे केसांसाठी न्यूट्रीएंटचे काम करते व आपल्याला याचा वापर रात्री झोपण्याच्यापूर्वी करायचा आहे ज्यामुळे केसांमध्ये धुळ, माती किंवा केस खराब होणार नाहीत.

महत्वाचे म्हणजे या तेलामध्ये विटामीन ए, विटामीन डी, अल्फा-फैटी अॅसिड असते जे केस मजबूत बनविते, केस गळती थांबविते व केस काळे होण्यास मदत करते. हे साधारण ५० मिलि घ्यायचे आहे. हे मंद आचेवर ठेवून ते आपल्याला गरम करायचे आहे. आता यामध्ये जो दूसरा घटक आपल्याला टाकायचा आहे तो आहे कडूनिंबाची पाने.

मित्रांनो, इथे तुम्हाला दिसत आहेत ते कडूनिंबाचे झाड आहे. या कडूनिंबाची साधारण १० पाने आपल्याला घ्यायची आहे. या कडूनिंब पानांमध्ये निंबेंनीन, निंबेडिन, इमबीड असे घटक असतात. हे केसातील कोंडा कमी करतात, केसांमधील फंगल इन्फेकशन कमी करतात, केस काळे, मुलायम व लांबसडक होतात. अशी १० पाने तोडून तुकडे करून या तेलात आपल्याला टाकायची आहेत.

असा हा कडूनिंब सगळीकडे उपलब्ध असतो. पण तुम्हाला जर कडूनिंबाची पाने मिळाली नाहीत तर त्याऐवजी तुम्ही कडूनिंबाचे तेल म्हणजेच निमतेल मार्केटमधून आणून ते वापरू शकता. आता हे मिश्रण मंद आचेवर गरम करायचे आहे जोपर्यंत पाने काळपट होत नाहीत तोपर्यंत. नंतर उतरून ते एक दिवस तसेच ठेवायचे आहे.

दुसर्याक दिवशी हे गळून घेऊन काचेच्या बाटलीत भरून ठेवायचे आहे हे रोज संध्याकाळी आपल्याला केसांच्या मुळाशी लावायचे आहे. हळुवार हाताने मालीश करायचे आहे. सकाळी तुमच्याकडे जो शॅम्पू उपलब्ध असेल, त्याने केस धुवून टाकायचे आहेत. आयुर्वेदिक शॅम्पू वापरला तर उत्तम. अशा या तेलाचे परिणाम तुम्हाला १५ दिवसात दिसून येतील.

आपण नेहमी वापरू शकतो कारण हे नैसर्गिक असल्याने याचा कोणताही दुष्परिणाम केसांवर होणार नाही. आमची ही माहिती आवडली असेल तर लाइक व शेअर जरूर करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *