Thursday, January 27
Shadow

४ वेळा घेताच, अंगदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी गायब, हाडे मजबूत, ८० वर्षांपर्यंत कॅल्शियमची कमतरता भासणार नाही….

मित्रांनो, कोणत्याही वयात शरीरात वेदना होणे ही सर्वसाधारण गोष्ट आहे पण जेव्हा ह्या वेदना जास्त प्रमाणात होतात, तेव्हा खूपच त्रास होतो. कोणतेही काम करण्यात खूपच समस्या निर्माण होतात. नेहमी लोकांना कमरेत जडत्व, पाठ व सांध्यांमध्ये वेदनांची तक्रार असते. पण लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. पण असे करणे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते.

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे पाठ दुखणे, कंबरदुखी, केस गळणे, सांधेदुखी, दातदुखी, लवकर थकवा येणे, नखे अशक्त होणे, हृदयाची धड धड वाढणे यासारखी सगळी लक्षणे बघायला मिळतात. आम्ही तुम्हाला या माहितीद्वारे कॅल्शियमची कमतरता वेगाने पूर्ण करणारे उपाय सांगणार आहोत. म्हणून तुम्हाला विनंती आहे, की ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघा.

कॅल्शियमची पूर्तता करण्यासाठी सगळ्यात पहिली जी वस्तु घेणार आहोत ती म्हणजे रागी., अर्थात नाचणी. दुसर्‍या धान्यांच्यापेक्षा नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण ३ ते ५ पट जास्त असते. लहान मुले व मोठ्यांमध्ये हाडांच्या मजबूतीसाठी नाचणी हे एक परिपूर्ण अन्न आहे. तुम्ही जास्तीत जास्त नाचणी पासून बनलेल्या पदार्थांचे सेवन करा, जसे की भाकरी, इडली, डोसा.

तुम्ही नाचणीचे पीठ गव्हाच्या पिठात मिसळून चपाती बनवून खाऊ शकता. त्याशिवाय तुम्ही रागीमाल्ट घेऊ शकता. मित्रांनो, नाचणीची सगळ्यात खास गोष्ट ही आहे, की शरीरात कधीही कॅल्शियमची कमतरता येत नाही व शारीरिक दुर्बलता पण दूर होते. ज्यांचे वजन जास्त आहे त्यांनी पण हे घ्यायला हरकत नाही.

दूसरा उपाय आहे खसखस, दूध. दीड चमचा खसखस थोड्या पाण्यात २ ते ३ तास भिजत ठेवा. १ ग्लास दुधात खसखस पाण्यासाहित मिसळा. दूध उकळा व गोडीसाठी खडीसाखर घाला. हे दूध संध्याकाळी ४ नंतर कधीही सेवन करा. रात्री झोपायच्या आधी पण हे घेऊ शकता. हाडांसाठी खसखसचे अनेक फायदे आहेत. खसखसमध्ये कॅल्शियम, झिंक, कॉपर यासारखी पोषक तत्वे आहेत. ही दोन्ही तत्वे हाडांना मजबूती देण्यासाठी उपयोगी आहेत.

शरीराबरोबर बुद्धीसाठी पण खसखस उपयोगी आहे. वजन कमी करते. बद्धकोष्टता नियंत्रित करते खसखस. अनिद्रा असेल तर हे दूध उपयोगी आहे. दूध व दुधापासून बनलेल्या पदार्थांचे सेवन करा कारण दुधात जास्त प्रमाणात कॅल्शियम असते. १ ग्लास दुधात ३०० मिलिग्राम कॅल्शियम असते. दही पण कॅल्शियमचा चांगला स्त्रोत आहे. डाळींमध्ये मुगडाळ, राजमा, सोयाबीन, चणे यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.

मोहरीच्या तेलात लसूण ३ ते ४ पाकळ्या घालून गरम करा, लसूण काळी होत नाही तोपर्यंत गरम करा व हलक्या कोमट तेलाने कंबर व सांध्यांची मालीश करा. मीठ मिसळलेल्या गरम पाण्याने टॉवेल बुडवून शेक घ्या. कंबरदुखी थांबेल. कढईत मीठ टाकून शेका व सूती कपड्यात ह्याची पोटली बांधा व कंबर शेका, आराम मिळेल. व्यायाम, योग करा. ही माहिती आवडली असेल, तर जरूर लाइक व शेअर करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *