या झाडाचे पान जवळ ठेवा समोरची व्यक्ती तुम्ही म्हणाल ते ऐकेल…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो समोरच्या व्यक्तीला तुमच्याकडे प्रचंड आकर्षित करणारा आणि तुम्ही जे काही म्हणाल ते समोरची व्यक्ती नक्की ऐकेल असा एक प्रचंड वश करणारा उपाय आज आपण पाहणार आहोत. हा उपाय पती-पत्नी एकमेकांसाठी करू शकतात.

जर तुमच्यामध्ये सतत भांडेने होतात अगदी घटस्फोटा पर्यंत परिस्थिती आलेली आहे, पती तुमचे म्हणणे ऐकत नाही, पत्नी तुमचे म्हणणे ऐकून घेत नाही अश्या वेळी ते हा उपाय करू शकतात. प्रेमी जोडपे हा उपाय एकमेकांसाठी करू शकतात. जर आई वडिलांचे म्हणणे तुमची मुले मुली ऐकत नाहीत, तुमच्या आज्ञे बाहेर आहेत, त्यांना वाईट वळण लागलेले आहेत.

तर अशी मुल मुली तुमच्या आज्ञेत राहावीत म्हणून आई वडील हा उपाय करू शकतात. तुमचे सहकारी तुम्हाला त्रास देतात, तुमच्या हो मध्ये हो मिळवत नाहीत तर अश्या लोकांसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. मित्रांनो केवळ एका झाडाची पाने तोडून तुमच्याजवळ ठेवायची आहेत. मात्र ती नक्की कधी तोडावीत? अशी ठेवावीत? योग्य विधी कोणती आहे? हे आपण आता पाहणार आहोत. चला तर मग पाहुयात..

मित्रांनो या सृष्टी मध्ये अनेक शक्ती आहेत की ज्या आजूबाजूच्या वस्तूं आहेत त्यांना प्रचंड प्रमाणात आकर्षित करतात. हो! अश्या अनेक शक्ती आहेत ज्याचे मानवाला ज्ञान नाही. आपल्या पुरातन प्राचीन ग्रंथांमध्ये असे अनेक उल्लेख आढळतात, असे अदभूत ज्ञान आहे की ज्या ज्ञानाचा वापर करून मानव आपल्या जीवनातील मोठ्यात मोठ्या समस्या दूर करू शकतो.

मित्रांनो आज जो आपण उपाय करणार आहोत तो जर शुक्रवार च्या दिवशी केला तर प्रचंड प्रमाणात समोरच्या व्यक्तीच वशीकरण करता येत. जर तुम्हाला शुक्रवार च्या दिवशी हे करणे शक्य नसेल तर आपण आठवड्यातील कोणत्याही वारी हा उपाय करू शकता. मात्र अट एकच आहे या उपायाचा दुरुउपयोग अजिबात करू नका. केवळ चांगल्या हेतूने तुम्ही हा उपाय करा.

मित्रांनो या साठी आपल्याला ज्या झाडाची पाने लागणार आहेत ते झाड आहे ‘लाजाळूच’… या झाडाचं वैशिष्ट्य अस आहे की याची पाने दिवसा उघडलेली असतात आणि रात्री ती मिटतात. याची दुसरी ओळख अशी आहे की या झाडाला जर तुम्ही स्पर्श केला तर त्याची पाने आपोआप मिटतात आणि म्हणूनच की काय याला लाजाळू असे नाव मिळाले असावे.

हिंदीमध्ये याला लाजवंती असे म्हंटले जाते. तंत्र शास्त्रात याचा अनेक प्रकारे उपयोग केला आहे. मित्रांनो या झाडाची पाने आपण शुक्रवार च्या दिवशी तोडून आणायची आहेत. पाने तोडून आणल्यानंतर आपण आपल्या देवघरासमोर बसायचे आहे. अश्या प्रकारे बसल्यानंतर ही जी पाने आहेत ती आपल्या अनामिक बोटा वर ठेवायची आहेत. (करंगळी च्या बाजूच्या बोटाला अनामिक म्हणतात.) ही पाने ठववल्यानंतर त्या वरती लाल रंगाचे कापड गुडळायचे आहे. अश्या प्रकारे गुंडळा की ही पाने बाहेर पडता कामा नये.

यानंतर आम्ही जो मंत्र सांगणार आहे त्याचा जप तुम्ही 108 वेळा करायचा आहे. मंत्र आहे “ॐ नमो भगवते वासुदेवाय अनुकंम वश्यम कुरु कुरु स्वःहा”. या ठिकाणी अनुकंम च्या जागी त्या व्यक्तीचे नाव आपण या ठिकाणी घ्यायचे आहे. उदा. जर त्या व्यक्तीचे नाव अ ब क असेल तर ॐ नमो भगवते वासुदेवाय, अ ब क वश्यं कुरु कुरु स्वाहा”.अश्या प्रकारे आपण मंत्र जप करायचा आहे.

मंत्र जप झाल्यानंतर मनोभावे हात जोडून समोरची व्यक्ती वश व्हावी तिने आपले म्हणणे ऐकावे या साठी आपण परमेश्वराकडे प्रार्थना अवश्य करायची आहे. मित्रांनो नंतर तुम्ही ज्या व्यक्तीला वश मध्ये करणार आहात त्याच्या जवळ जाऊन, त्याच्या डोळ्यात डोळे घालून वश्यम वश्यम असे दोन मिनिटे म्हणायचे आहे. तर हा उपाय तुम्ही नक्की करा.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये. माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *