फक्त चिमूटभर झोपताना घ्या, सकाळी झटक्यात पोट साफ, कितीही भयंकर गॅस बंद…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आह. मित्रांनो बऱ्याच व्यक्तींना पोट साफ न होण्याची समस्या असते. यासोबतच बऱ्याच व्यक्तींचं पोट गच्च, सतत अपचन होणे, गॅस होणे, तसेच बऱ्याच व्यक्तींना वारंवार पित्त होणे, तोंड येणे, अश्या सर्व समस्या कमी करण्यासाठी आज घरात सहज करता येणारा उपाय पाहणार आहोत. चला तर पाहुयात या उपायासाठी कोणते पदार्थ लागतात.

मित्रांनो अश्या या उपायासाठी आपल्याला लागणार आहेत जिरे, ओवा, बडीशेप, आणि सैंधव मीठ. असे हे पदार्थ सहज आपल्या घरात उपलब्ध असतात. मित्रांनो मसाल्यांचा राजा बडीशेप बद्धल आपल्याला माहीतच आहेत. जेवण झाल्यानंतर अपचन, पोट साफ होण्यासाठी आपण बडीशेप खात असतो. तसेच ओवा आणि जिऱ्याचे सुद्धा खूप गुणधर्म आहेत.

अश्या या उपायासाठी आपण घ्यायचे आहे दोन चमचे जिरे. यासोबत आपल्याला लागणार आहे दोन चमचे ओवा. पोट साफ होण्यासाठी ओवा खूप उपयुक्त असतो, तसेच गॅस ची समस्या कमी करण्यासाठी ही ओवा खूप उपयुक्त आहे. मित्रांनो सुरुवातीला हे दोन पदार्थ जिरे आणि ओवा आपल्याला तळव्यावरती चांगले भाजून घ्यायचे आहेत. लाल होई पर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. हे पदार्थ भाजल्यानंतर ते बाहेर काढून घ्या.

मित्रांनो जिरे आणि ओवा भाजून घेतल्यानंतर आपल्याला त्या मधेच एक चमचा बडीशेप टाकायची आहे. तसेच या मध्ये अर्धा चमचा सैंधव मीठ टाकायचे आहे. मित्रांनो सर्व मिश्रण आपल्याला घरात जेही साहित्य असेल त्याने बारीक करून घ्यायचे आहे.

तुम्ही मिक्सर चा वापर सुद्धा करू शकता. हे मिश्रण बारीक करून झाल्यानंतर एक ग्लास आपल्याला कोमट पाणी घ्यायचे आहे. आता या कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा तयार झालेले मिश्रण टाकायचे आहे. यानंतर हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करायचे आहे आणि हे मिश्रण आपल्याला झोपताना घ्यायचे आहे.

झोपताना घेतल्यानंतर सकाळी उठल्यानंतर तुमचे पोट एकदम साफ होईल. तर मित्रांनो हा साधा आणि सोपा उपाय तुम्ही नक्की करून पाहा. तुमचे पोटाच्या सर्व समस्या निघून जातील. उपाय आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा…

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *