ही 5 माणसे धोका देतातच – चाणक्य नीति मराठी…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो या पाच व्यक्ती धोका देतातच. होय, या पाच व्यक्ती शंभर टक्के विश्वासघात करतात. प्रेम असो, मैत्री असो, विवाह किंवा लग्न असो मित्रांनो लोक पदोपदी धोका देत आहेत. पती पत्नीला धोका देत आहे, पत्नी पतीला धोका देत आहे, एक मित्र दुसऱ्या मित्राला धोका देत आहे एवढंच काय जीवापाड प्रेम करणारे प्रेमी आणि प्रेमिका कधीना कधी तरी धोका देत आहेत.

मित्रांनो एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याला धोका देते, विश्वासघात करते तेव्हा प्रचंड वेदना, दुःख होते. असं वाटते की आपण त्या व्यक्तीला ओळखू शकलो नाही. जर वेळीस त्या व्यक्तीला ओळखलं असतं तर अशा प्रकारे आपल्याला धोका मिळाला नसता. मित्रांनो आचार्य चाणक्यांनी त्यांच्या चानक्यनीती या पाचव्या अध्यायातील दुसऱ्या श्लोकामध्ये असे सांगितले आहे.

ज्याप्रमाणे सोने पारखायचे असेल, सोन खरं आहे का खोटं हे जर पडतळायचे असेल तर सोनं रगडाव लागतं. सोन्याला आगीमध्ये तापवावं लागते आणि हातोडीने त्याच्यावर वार करावे लागतात. मित्रांनो ज्याप्रमाणे सोन्याची पारख करण्यासाठी हे असे मार्ग आपण अवलंबतो अगदी त्याच प्रमाणे समोरची व्यक्ती विश्वासास पात्र आहे की नाही हे सुद्धा तपासून पहावं लागते. चाणक्य म्हणतात की अशा पाच व्यक्ती आहेत ज्यांच्यावरती माणसाने चुकूनही विश्वास ठेवू नये. तर त्या पाच व्यक्ती कोणत्या आहेत ते पाहुयात.

पहिली गोष्ट ज्या व्यक्ती चुकीचं काम करतात, चुकीचं काम करून पैसा कमवतात. मित्रांनो तुमच्या आसपास अशा अनेक व्यक्ती असतील कदाचित तुमचे मित्र सुद्धा असतील की जे चुकीचा मार्ग अवलंबतात आणि पैसे कमवतात. मित्रांनो अशा लोकांवरती चुकूनही विश्वास ठवू नका. चाणक्य म्हणतात यांच्यापासून चार हात लांब रहा.

याचं कारण असे आहे की हे लोक त्यांच्या स्वार्थासाठी कोणालाही धोका देऊ शकतात अगदी तुम्हालासुद्धा. जेव्हा तुमच्याकडून एखादा स्वार्थ साधायचा असेल तेव्हा हे लोक तुम्हाला धोका द्यायला मागेपुढे पाहणार नाही. याउलट जे लोक धार्मिक आहेत चांगल्या मार्गाने पैसा कमवतात त्या लोकांवरती डोळे झाकून विश्वास ठेवा. मित्रांनो तुम्ही पाहिलं असाल वाईट मार्गाने पैसे कमावणारे व्यक्ती या प्रत्येकाला धोका देत असतात.

मित्रांनो दुसरी गोष्ट चाणक्य म्हणतात समोरच्या व्यक्तीचे चरित्र पाहा मग ठरवा समोरची व्यक्ती धोका देईल की नाही. चरित्रावरून समजते एखादी व्यक्ती भरवशास लायक आहे की नाही. ज्या व्यक्तीचे चरित्र चांगले नाही, जो व्यक्ती चरित्रसंपन्न नाही अशा व्यक्तीवर भरवसा ठेऊ नका. या व्यक्ती कोणाच्याही बाबतीत चांगला विचार करत नाहीत आणि कधीना कधी तरी धोका नक्की देतात. म्हणून एखादी व्यक्ती चारित्रहीन आहे की नाही याची खातरजमा नक्की करा. जर त्याचं चारित्र चांगलं नसेल तर त्या व्यक्तीपासून धोका नक्की मिळणार आहे.

तिसरी गोष्ट क्रोधी व्यक्ती. ज्यांना खूप लवकर राग येतो त्या खूप रागीट असतात. आळशी असतात, सतत आळस भरलेला असतो. स्वार्थी असतात, घमंडी असतात. स्वतःला मोठं समजतात. नेहमी खोटे बोलतात. अशा व्यक्तींवर कधीच विश्वास ठेवू नका. कारण वेळ आल्यावर हे लोक नक्की विश्वासघात करतात आणि याउलट जे लोक शांत स्वभावाचे असतात, नेहमी खरे बोलतात. अशा या शांत लोकांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य म्हणजे या लोकांवरती डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो. हे लोक कधीच कोणालाही धोका देत नाहीत.

मित्रांनो चौथी गोष्ट आपण पाहत आहे. ही खुण अशी आहे की यावरून तुम्ही शंभर टक्के ओळखू शकता की समोरची व्यक्ती भरवशास लायक आहे की नाही. जी व्यक्ती स्वतःच्या सुखांचा विचार न करता दुसऱ्यांच्या सुखासाठी राबते अशा व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवा आणि याउलट अशी व्यक्ती की जीला तुमच्या सुखदुःखांशी काही देणे घेणे नसते, तुम्ही सुखात आहात की दुःखात आहात हे पाहत नाही व स्वतःच्या सुखदुःखांचा विचार करते ती व्यक्ती कधीना कधी धोका नक्की देते. अशी पाच लोक जी आपल्याला नक्की धोका देतात. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *