हे तेल केस इतके काळे करेल कि तुम्ही डाय वापरणे विसरून जाल…

आज एक तेल बनवूया जे घरात उपलब्ध गोष्टी वापरून बनवले आहे , जे फारच उपयोगी आहे. हे तेल केस काळे करेल, मजबूत करेल, केसांना चमकदार बनवेल आणि केसांना कंडिशन करेल. यासाठी जे घटक लागतात ते घरात सहज उपलब्ध असतात.

महत्वाचे हे आहे कि हे तयार कसे करायचे आणि लावायचे कसे. हे तेल आपण लोखंडच्या कढईत बनवणार आहोत कारण यातील घटक केसांना काळे करण्यास मदत करतात. वयाच्या ३० वर्षानंतर केस पांढरे व्हायला सुरवात होते, आपण डाय लावायला सुरवात करतो त्यामुळे आजूबाजूचे केसही पांढरे होऊ लागतात. असे होऊ नये म्हणून तुम्ही हे तेल वापरा.

हे तेल वापरायला लागल्यावर तुम्हाला याचे लगेच परिणाम दिसायला लागतील. पांढरे केस काळे होतीलच पण केस पांढरे होणं थांबेल. एका लोखंडाच्या कढईत एक कप मोहरीचे तेल घ्या. मोहरीच्या तेलात ओमेगा ३ फॅटी ऍसिड असतात जे केस काळे करण्यास मदत करतात. तुम्ही मोहरीच्या तेलाऐवजी नारळाचे तेल किंवा दोन्ही समप्रमाणात घेऊ शकता.

कढईत तेल घेऊन त्यात एक छोटा चमचा मेथी पावडर घाला. मेथी पावडर केसांना मजबूत, निरोगी, लांब करण्यास मदत करते. आता यात एक चमचा आवळा पावडर घाला. आवळा पावडर लोखंडच्या कढईत घेतल्याने उत्तम काम करते. नंतर यात दोन छोटे चमचे मेंदी पावडर घाला. मेंदी पावडर इतर घटकांबरोबर वापरल्यामुळे केस लाल न होता काळे होतील.

या तिन्ही गोष्टी तेलात घालून छान ढवळून घ्या. मिश्रण एकजीव झाल्यावर कढई बारीक गॅसवर ठेवा. मिश्रण पाच मिनिटे उकळवा. तेलात घातलेले घटक पदार्थ करपता कामा नयेत, फक्त उकळी आली पाहिजे. पाच मिनिटानंतर तेलात ब्राऊन कलर येईल. गॅस बंद करून कढईवर झाकण ठेवा. हे २४ तास असेच ठेवा.

२४ तासानंतर तेल तयार होईल. ते काळे आणि घट्ट होईल. हे तेल केसांना कधीही लावू शकता. कमीतकमी ३ तास हे केसांना लावून ठेवा मग केस धुवून टाका. रात्री लावून ठेवल्यास उत्तम परिणाम मिळतील. आठवड्यातून दोनदा हे तेल वापरा आणि महिन्याभरात फरक पहा. तुमचे केस कोरडे असतील तर यात दोन व्हिटॅमिन इ कॅप्सूल घालू शकता.

मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्ही कृती करू शकता, https://youtu.be/PRp1iBlUGxM मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *