सकाळी सकाळी तुळशीला जल अर्पण केल्याने काय घडते?

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आपण पूर्वीपासून ऐकत आलो आहोत की सकाळी अंघोळ झाल्यानंतर सर्वात आधी एक तांब्या तुळशीला पाणी अर्पण करून तुळशीचे पुजन करावे. आपण तुलशीला पाणी अर्पण करतो, धूप दीप लावतो, हळद कुंकू अर्पण करतो आणि हात जोडून नमस्कार करतो.

परंतु कधी आपल्याला असे वाटते का दुसऱ्या झाडाझुडपांना इतके महत्त्व नाही. मग तुळशीच्या रोपाला इतके महत्त्व का? तुळशीचे पूजन आपण जर दररोज केले, पाणी अर्पण केले तर काय घडते हे आपण जाणून घेणार आहे की तुळस कोण आहे? तिचे इतके महत्त्व का आहे? त्याशिवाय तुळशीला पाणी अर्पण केल्यास धार्मिक व वैज्ञानिक कारण काय आहे.? त्यासाठी सर्वात आपण तुळशी विषयी पुराणात एक कथा आली आहे ती पाहुयात. म्हणजे आपल्या लक्षात येईल की तुळस कोण आहे व तिला पाणी अर्पण केल्याने आपल्याला काय काय फायदे होतात ते.

जालिंदर नावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस होता. आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्याने देवांना आणि साधुसंतांना त्राही त्राही करून सोडले होते. त्याला कसे रोखायचे असा सर्व देवांना प्रश्न पडला. मग सर्व देव श्री हरी विष्णूंना शरण जाऊन जालिंदरपासून आपले रक्षण करण्याची विनंती केली. तेव्हा श्री हरी विष्णूंनी जालिंदरची माहिती काढली आणि त्यांना कळले त्याची पत्नी वृंदा ही सती पतीवदा आहे.

तिच्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यानेच जालिंदर विजयी होत आहे. त्याला पराजीत करायचे असेल वृंदाच्या पतीवृत्ताचा भोंग करणे हाच उपाय आहे. ते करण्यास कोणीही पुढे जात नाही. अखेर ती जबाबदारी श्री हरी विष्णू स्वीकारतात. जालिंदराचे रूप धारण करून श्री हरी विष्णू वृंदेच्या महालात जातात. आपले पती आले आहेत असे समजून वृंदा त्यांना आलिंगन देते. तिच्या पतीव्रताचा भंग होताच जालिंदराचा मृत्यू होतो. देवांनी मारलेल्या बाणाने त्याचे शीर तुटते आणि ते वृंदेच्या दारात पडते.

नवऱ्याचे शीर पाहताच वृंदा चकित होते आणि श्री हरी विष्णूंना विचारते तू कोण आहेस. त्यावर श्री हरी विष्णू आपले खरे रूप धारण करतात. संतप्त झालेली वृंदा श्री हरी विष्णूंना तू दगड होऊन पडशील आणि मला माझ्या पतीचा विरह तुझ्यामुळे घडला तसाच तुलाही तुझ्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल असा शाप देते. भगवंत तिची क्षमा मागतात तेव्हा वृंदा म्हणते तू मला आता भ्रष्ट केलेस आता मला कोण स्वीकारेल.

तेव्हा भगवंत म्हणतात मी तुझा स्वीकार करतो. इतकेच नव्हे जे लोक तुझी पुजा करतील त्यांच्यावर माझीही कृपा असेल. त्यानंतर वृंदा सती जाते. पुढे तिच्या शापामुळेच राम अवतारामध्ये भगवंताना सीतेचा विरह सहन करावा लागला. देव दगड होऊन पडले त्यालाच शालीग्राम म्हणतात. ज्याठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार झाले तिथे तुळशीचे रोप उगवले.

हीच ती तुळस वृंदेच्या नावावरूनच ज्या ठिकाणी तुळस लावली जाते तीला वृंदावन असे म्हटले जाते. तीच तुळस कृष्णाने पांडुरंगाने धारण केली आहे. तिला भगवंताने स्वीकारले याचे प्रतीक म्हणून शालीग्राम हा जो दगड आहे त्याला देव मानून त्याचा विवाह तुळशीसोबत लावला जातो. ती भगवंताची प्रिय होते म्हणूनच तिला धारण करणाऱ्यांवर भगवंत प्रेम करतात अशी श्रद्धा आहे. याच विचाऱ्याने वारकऱ्यांनी तुळशीला पूजनीय मानले आहे.

आता आपण वैज्ञानिक महत्त्व जाणून घेऊया. जगातील प्रत्येक वनस्पती दिवसा ऑक्सिजन व रात्री कार्बनडाऑक्साइड सोडते. अपवाद फक्त पिंपळ कारण रात्रीही ऑक्सिजन सोडते. म्हणूनच भगवान श्री कृष्णांनी म्हटले आहे की सर्व वृक्षात मी अश्वस्त म्हणजे पिंपळ आहे. मात्र तुळस एकमेव अशी वनस्पती आहे की दिवसा ऑक्सिजन रात्री कार्बनडायऑक्साइड व फक्त पहाटेच्या वेळी 0.03 टक्के ओझोन हा वायू सोडते.

या वायूच्या संपर्कात मनुष्य आल्यास त्याच्या मेंदूत YHTPN सॅरोटीनीन नावाचे संप्रेरक स्रवते ज्यामुळे मनुष्य दिवसभर प्रसन्न व आनंदी राहतो. तसेच त्याची रोग प्रतिकारक शक्तीही बळकट होते. आयुर्वेदानुसार तुळशीमुळे सर्दी, ताप, खोकला, त्वचारोग मधुमेह, रक्तदाब, पोटाचे व किडनीचे विकार, कॅन्सर होत नाहीत. कारण तुळशीच्या मुळ्या, खोड, बिया, पाने , फुले हे सर्वच औषधी आहे. शिवाय तुलशीतून निघणाऱ्या शुभस्पंदनामुळे वातावरणही शुद्ध होते.

या सर्व बाबींचा विचार करूनच पूर्वसुरांनी पहाटे तुळशीला पाणी घालण्यास सांगितले आहे ज्याच्या घरची तुळस फुललेली असते त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो. जिथे रोज सायंकाळी दिवे लागण होते तिथे भक्तीची कमतरता नसते. जिथे शुभम करोती होते तेथे संस्काराची नांदी असते. जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तेथे माणसांची कमी नसते. मित्रांनो आता लक्षात आले असेल सकाळी सकाळी तुळशीला पाणी अर्पण केल्याने काय होते ते. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *