फक्त 2 चमचे, भाजीत एकत्र करा, हात पायाला मुंग्या येणे, पित्त बंद 72000 नसा मोकळ्या…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो एक नवीन उपाय खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. सकाळी उठल्याबरोबर पायाला जर मुंग्या येत असतील, वेदना होत असतील, खाली पाय टेकताच टाच दुखीचा त्रास जाणवत असेल, सांधेदुखी, गुडघेदुखी, सोबतच बऱ्याच जणांना पित्ताचा, ऍसिडिटी चा त्रास असेल सोबतच अपचन, गॅस, वारंवार पोट गच्च होणे, आणि पोट साफ न होणे अश्या समस्या जर तुम्हाला जाणवत असेल तर या सर्व समस्येवर आज एक उपाय घेऊन आलो आहोत. चला तर उपयाला सुरुवात करूयात..

उपाय सुरू करण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीला या गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे की आपल्या आहारामध्ये ज्या भाज्यांचा समावेश करतो या भाज्यांमध्ये काही पदार्थ हे वातकारक असतात. आपल्या शरीरातील स्ट्रेस वाढवतात. आपल्या शरीरातील आजार वाढवतात. तुम्हाला किंव्हा इतर कोणालाही डॉक्टरांनी सल्ला दिला असेल की तुम्ही अश्या प्रकारच्या भाज्या खाऊ नका.

अश्या भाज्यांमध्ये तुम्हाला सांगितलं जातं की बटाटे, वांगी, भेंडी, तूरडाळ, इडली-सांबर, गवार, लाल भोपळा, हरभरे, या बरोबरच ज्यांना ऍसिडिटी चा भयंकर प्रमाणात त्रास होतो अश्या व्यक्तींना सांगितले जाते की तूरडाळ पूर्णपणे कमी करायला हवी. मित्रांनो तर असे पदार्थ आपल्या शरीरातील वात वाढवतात. असे हे जे पदार्थ तुम्हाला आवडत असेल आणि हे जर पदार्थ तुम्हाला खाऊ वाटत असेल तर या वर आजचा उपाय खूप रामबाण ठरतो.

मित्रांनो अश्या या उपायासाठी सर्वात पहिला घटक लागणार आहे मेथी.. अपचनाची समस्या कमी होण्यास मेथी अत्यंत गुणकारी मानली जाते. मेथी दाण्यामध्ये असणारे फायबर आणि स्टेरॉइड दोन पद्धतीने काम करतात. एक म्हणजे शरीरात इन्सुलिन ची संवेदनशीलता वाढवतात. याची मधुमेह साठी खूप गरज असते.

दुसरे म्हणजे या मुळे कोलेस्टेरॉल नियंत्रीत राहते, सोबतच प्रतिकारशक्ती वाढते. म्हणून आजच्या उपायासाठी पहिला पदार्थ आपल्याला लागणार आहे मेथी एक चमचा… दुसरा पदार्थ लागणार आहे ओवा. मित्रांनो आयुर्वेदानुसार ओवा पोटाच्या विकारावर अत्यंत रामबाण मानला जातो.

ओव्याच्या सेवनाने शरीरातील टॉक्सिक घटक बाहेर निघण्यास, पित्त, ऍसिडिटी, उलटी, पोट दुखणे, अपचन कमी होते, सोबतच ओव्याच्या सेवनाने पचनतंत्र सुधारते. म्हणून आपल्याला एक चमचा ओवा लागणार आहे.

मित्रांनो तिसरा घटक लागणार आहे मोहरी. आयुर्वेदानुसार मोहरी उष्ण असल्याने वातेचे शमन करते. म्हणून सांधेवातावर मोहरी अतिशय गुणकारी ठरते. सोबतच मोहरीच्या सेवनाने शरीरातील रक्त प्रवाह सुधारतो. हाडाचे दुखणे, थकवा, थांबण्यास मदत होते. म्हणून आजच्या उपायासाठी एक चमचा मोहरी लागणार आहे.

असे तीनही पदार्थ मेथी, ओवा, मोहरी एकत्रित करा. हे पदार्थ आपल्या शरीरातील वात वाढण्याची गती आहे ती कमी करतात. असे हे पदार्थ नेहमी भाजी बनवताना एक चमचा जर भाजीमध्ये टाकले तर भाजी एकदम रुचकर, पाचक बनते. वातूळपणा आहे तो कमी होतो. पचन चांगल्या प्रकारे होते. असे हे पदार्थ खाल्याने वजनही वाढत नाही. असे हे पदार्थ वापरा नक्की तुम्हाला याचा फायदा होईल.

मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्ही कृती करू शकता, https://youtu.be/PRp1iBlUGxM मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *