दिवसभरात कधीही प्या, हाडे मजबूत, कॅल्शियमची कमतरता होणारच नाही, थकवा, अशक्तपणा सोडून जाईल…

शरीरात होणाऱ्या सांधेदुखी, कॅल्शिअमची कमतरता यासाठी आज तुम्हाला एक घरगुती उपाय सांगणार आहोत. या उपायाने तुम्हाला बाजारातून कॅल्शिअमच्या गोळ्या घेण्याची गरज रहाणार नाही. दोन चमचे खसखस घ्या. खसखसशीत ओमेगा ३ फॅटी ऍसिड, ओमेगा ६ फॅटी ऍसिड, प्रोटीन आणि मोठ्या प्रमाणात फायबर, कॅल्शिअम, मँगनीज, थायमिन असते.

खसखशीच्या सेवनाने पचनशक्ती सुधारते, झोप न येण्याची समस्या दूर होते. आपल्या घरात सहज उपलब्ध असणारी दुसरी वस्तू आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे तीळ. दोन चमचे काळे किंवा पांढरे जे उपलब्ध असतील ते तीळ घ्या. १ चमचा तिळाच्या सेवनाने १०० ग्राम कॅलशिअम शरीराला मिळते. खसखस अतिशय गुणकारी आहे.

खसखस आपल्या दात, हाडे आणि मेंदू साठी उपयुक्त आहे. तीळ वाढलेली कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करतात. तिळात काही अमिनो ऍसिडस् असतात जी आपल्या हाडांना मजबूत बनवतात. त्यामुळे सांधेदुखीसाठी तिळाचे सेवन अतिशय गुणकारी आहे. रोज एक चमचा तीळ अवश्य खावेत.

स्वस्त, सहज उपलब्ध आणि कॅल्शिअमयुक्त असतात तीळ.याचबरोबर सात ते आठ बदाम घ्या. बदामामुळे आपले हृदय, मेंदू, डोळे चांगले रहातात. बदाम मोठ्या प्रमाणात फायबर, व्हिटॅमिन,कॅल्शिअम, व्हिटॅमिन डी असते. खसखस , तीळ , बदाम यांची मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्या. हि पावडर चाळायची गरज नाही.

हि पावडर एखाद्या घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा म्हणजे ती तुम्हाला अनेक दिवस वापरता येईल. रोज एक चमचा या पावडरचे सेवन करा. तुम्ही जरा दुधाबरोबर हि पावडर घेतलीत तर तुम्हाला याचे जास्त चांगले परिणाम मिळतील. ज्यांना दुधाची ऍलर्जी असेल त्यांनी एक चमचा हि पावडर खाऊन त्यावर एक ग्लास गरम पाणी प्यावे.

तुम्हाला असे दिसून येईल कि तुमच्या शरीरातील कॅल्शिअमची कमतरता हळूहळू भरून निघत आहे. तुम्हाला ताजेतवाने, उत्साही वाटू लागेल. सांधेदुखीपासून सुटका मिळेल. अशक्तपणा , थकवा दूर होईल. मुलांना जर हि पावडर देत असाल तर एक चमचा द्या. मोठ्या वयाच्या व्यक्ती जर घेत असतील तर दोन चमचे पावडर घ्या.

हि पावडर गरम दुधात घालून घ्या. वजन कमी करायचे असेल तर दुधाची साय काढून दूध घ्या किंवा लो फॅट दूध वापर. दूध जो एक पूर्ण आहार आहे. यात अनेक व्हिटॅमिन्स , मिनरल्स, भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असते. म्हणूनच दुधाला पूर्ण अन्न म्हणतात. गायीचे दूध वापरल्या उत्तमच.

गोड लागण्यासाठी दुधात गूळ किंवा खडीसाखर घाला. खडीसाखरेमुळे हिमोग्लोबिन वाढते, हातापायाची आग कमी होते. या सगळ्या गोष्टी दुधात घाला. दूध गरम झाल्यावरच त्यात त्यात केलेली पावडर घाला. चार ते पाच मिनिटे उकळवा. हे दिवसातून एकदाच घ्यायचे आहे. हे दूध रात्री घेतल्यास याचा जास्त परिणाम दिसून येईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *