विनंती करतो लहान मोठे सर्वांनी खा ही 2 पान, फुफुसे साफ होतील छातीतील कफ जळून जाईल…

नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे. मानवी शरीर जिवंत ठेवायचे असेल तर ऑक्सिजन हा फार महत्त्वाचा घटक आहे. आणि ऑक्सिजन आपल्या रक्तामध्ये मिक्स करण्याचे काम आपल्या शरीरामधील फुफ्फुसे करत असतात. फुफ्फुसांमध्ये जर व्हायरल इन्फेक्शन झाले असेल तर, ते इन्फेक्शन खूप जलद रीतीने होते. त्या ठिकाणी घाण साठते. त्याचबरोबर फुफ्फुसे डॅमेज होतात.

आपले फुप्फुस या इन्फेक्शनमुळे गच्च झाल्यामुळे हवे मधला ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये मिक्स होत नाही. ही समस्या ज्यांना इन्फेक्शन झालेले आहे किंवा होऊन गेलेले आहे त्यांना जाणवते. ज्यांना फुफ्फुसाचे इन्फेक्शन होऊन गेलेले आहे त्यांचा डॅमेज झालेल्या पेशींचा कचरा त्याच ठिकाणी पडलेला असतो. तो कचरा साफ होणे फार महत्त्वाचे असते.

या पेशी पुन्हा चांगल्या होणे फार महत्त्वाचे असते. जेणेकरून त्या पेशी पुन्हा शरीरामध्ये ऑक्सिजन चांगल्या प्रकारे व त्याच गतीने मिक्स करतील. हे जर होत नसेल तर दम लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे, दमल्यासारखे होणे, अशा प्रकारच्या तक्रारी आपल्याला जाणवत असतात.

आज जो उपाय सांगणार आहोत त्यामुळे ज्यांना इन्फेक्शन झाले आहे किंवा ज्यांना इन्फेक्शन होऊन गेलेले आहे परंतु श्वास घ्यायला अजूनही त्रास होतो, ऑक्सिजन लेव्हल वाढत नाही किंवा धाप लागते अशा व्यक्तींसाठी करता येणारा हा उपाय आहे. इन्फेक्शन होऊ नये म्हणून देखील हा उपाय आपल्याला करता येतो. हा अतिशय उपयुक्त व जबरदस्त उपाय आहे. तर चला पाहुयात हा उपाय.

हा उपाय आपल्याला दोन प्रकारे करता येतो. सकाळी उठल्याबरोबर एका वनस्पतीची 2-4 पाने आपल्याला चाऊन खायची आहेत आणि संध्याकाळी झोपण्याआधी काढा प्यायचा आहे. ज्या वनस्पतीची पाने आपल्याला खायची आहेत ती म्हणजे “कडुलिंबाची पाने”. आयुर्वेदामध्ये कडूलिंबाला फार महत्त्वाचे स्थान आहे.

कडूलिंबामध्ये जी कडू द्रव्य असतात ते व्हायरसला तसेच कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन नष्ट करणारे असतात. लिंबेस्टेरिंन नावाचे जे ग्लूकोसाईड असते ते कोणत्याही प्रकारच्या व्हायरल इन्फेक्शन सोबत लढण्यासाठी फार महत्वाचे असते. म्हणून कडूलिंबाचे झाड ग्रामीण भागामध्ये फार महत्त्वाची भूमिका निभावणारे झाड मानले जाते.

यामुळे फुफ्फुसांमध्ये साचणारा जो कफ आहे किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळे डॅमेज झालेल्या पेशी असतील त्यांचा जो कचरा आहे तो बाहेर काढण्यासाठी कडूलिंबाचा पाला मदत करतो. या लिंबाचे औषधी गुणधर्म वायरल इन्फेक्शन ला नष्ट करतात. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर कडुलिंबाची दोन ते पाच पाने चावून खाल्ली पाहिजेत.

ज्यांना कडूलिंबाची पाने खाऊ वाटत नाहीत त्यांनी कडूलिंबाच्या पानाच्या गोळ्या ऑनलाईन मागवून घ्या किंवा आयुर्वेदिक दुकानांमध्ये सुद्धा मिळतात. सकाळी उपाशीपोटी दोन ते पाच पाने खायची आहेत आणि संध्याकाळी झोपण्यापूर्वी हळदीचे पाणी तयार करायचे आहे.

यासाठी एक ग्लास पाणी घ्या त्यामध्ये एक चमचा हळद टाका. हे चांगल्या प्रकारे उकळवून घ्या. थोडेसे कोमट झाल्यानंतर हा काढा प्या. यामध्ये थोडेसे मीठ टाकले तर त्याची चव सुद्धा चांगली लागते. आणि कफ नष्ट करण्यासाठी सुद्धा उपायकारक ठरते. हळदीमध्ये इन्फ्लामेट्री व अँटीव्हायरल गुणधर्म असतात.

इन्फ्लामेट्री गुण हळदीमध्ये असल्यामुळे फुप्फुसांमध्ये असणाऱ्या व्हायरल इन्फेक्शनमुळे ज्या पेशी डॅमेज झालेल्या आहेत त्या ठिकाणी जी सूज आलेली असते ती सूज कमी करण्याचे काम हे हळदीचे पाणी करते. त्याचबरोबर अँटीव्हायरल प्रॉपर्टीजमुळे तुम्हाला सर्दी, खोकला पूर्णपणे निघून जातो. हा उपाय सलग चार ते पाच दिवस केला तर तुमच्या छातीतील कफ पूर्णपणे निघून जाईल.

त्याचबरोबर इन्फेक्शन नंतर श्वास घ्यायला जो त्रास होत होता, तोसुद्धा निघून जाईल. असे केल्याने फुफ्फुस अगदी स्वच्छ राहील व शरीरातील ऑक्सिजन लेवल देखील वाढेल. याप्रमाणे सकाळी उठल्याबरोबर कडूलिंबाची पाने आणि झोपण्यापूर्वी हा हळदीचा काढा नक्की घ्या.

हा अत्यंत महत्त्वाचा आणि उपयुक्त उपाय आहे. अश्या प्रकारे फक्त हळद आणि कडूलिंबाच्या पानांचा वापर करून तुम्ही तुमचे फुफ्फुस व्हायरल इन्फेक्शन पासून वाचवू शकता. असा हा साधा सोपा उपाय तुम्ही नक्की करा आणि इतरांनाही सुचवा.आणि निरोगी आयुष्य जगा. धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *