सध्या चहा पाण्याऐवजी हाच काढा प्या! ऑक्सिजन लेवल 100 राहील, फुफ्फुसे मजबूत राहतील…

मित्रांनो आज आपण सध्याच्या या भयंकर काळामध्ये एक काढा घेऊन आलो आहोत. हा काढा तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. चहा पीण्याऐवजी हा काढा सर्वांनी पिला पाहिजे. यामुळे तुमचा सर्दी खोकला निघून जाणार आहे. कुठल्याही प्रकारचा संसर्ग होणार नाही.

जर संसर्ग झाला असेल तर तो बरा होण्यामध्ये हा काढा अतिशय उपयोगी आहे. तुमच्या फुफ्फुसाला डॅमेज होणार नाही. तुमचे ऑक्सजन लेव्हल देखील चांगलं ठेवण्यासाठी हा काढा उपयुक्त आहे. शिवाय तुमची प्रतिकारशक्ती मध्ये प्रचंड वाढ करण्याची ताकद या काढ्यामध्ये आहे. या काढ्यामुळे तुम्हाला उष्णता होणार नाही.

कारण याच्यामध्ये जे तीन प्रकार वापरलेले आहेत ते उष्ण नाहीत आणि म्हणून हा काढा सर्दी, खोकला, कुठल्याही प्रकारचा संसर्ग, फुफ्फुसाचं डॅमेज या सगळ्यांसाठी तर लाभदायी ठरणार आहे. तसेच उष्णतेचा त्रास देखील होणार नाही. तीन घरगुती पदार्थ जाणून घेऊया. त्यांचं व्यवस्थित प्रमाण देखील समजून घेऊया आणि काढा कसा बनवायचा आणि कधी घ्यायचा हे देखील समजून घेऊया.

सुरुवातीला आपण एका व्यक्तीसाठी लागणारा काढा बनवणार आहोत. यासाठी एक ग्लास पाणी घ्या. हे एक ग्लास पाणी उकळायला टाकायचे आहे. पहिला पदार्थ आहे गुळवेल. गुळवेल आयुर्वेदामध्ये अतिशय महत्त्वाचा मानला आहे. हा गुळवेल तुमची प्रतिकारशक्ती असुद्या, ताप, सर्दी, खोकला आणि तुमच्या शरीरात असलेला कफ तुमच्यासाठी खूप बहुगुणी आहे.

फक्त याच प्रमाण आपल्याला माहीत हवे. एक ग्रॅम पेक्षा जास्त सेवन या गुळवेलाच करायचं नाही. कारण त्याचे तोटे देखील होऊ शकतात. एक ग्रॅम म्हणजे साधारण आपला एक चमचा गुळवेल या काढ्यामध्ये टाकणार आहे. मित्रांनो सगळ्यात मोठ फायदा कुठला तर हा संसर्गाविरुद्ध लढण्याची ताकद तुमच्यामध्ये निर्माण करतो.

याच्यात असणार ग्लुकोसाईड, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक इ. खनिजे तुमच्या शरीरात चांगल्या प्रकारची प्रतिकारशक्ती निर्माण करतात. संसर्ग जागेवर रोखतात किंवा संसर्ग होऊन देत नाहीत. तर हा गुळवेल सहज आयुर्वेदिक दुकानात मिळणार आहे किंवा याची पावडर स्वरूपात मिळणार आहे. तर आपण हे एक चमचा घेणार आहोत. जास्त घ्यायचं नाही.

कारण जास्त घेतल्यानंतर वेगळा त्रास संभवतो. पुढचा पदार्थ तुमच्या ओळखीचा आहे तो म्हणजे तुळसी. या तुळशीची सात ते आठ पाने एका ग्लासच्या उपायासाठी घ्यायची आहेत. ही तुळशीचे पाने सहज उपलब्ध होतात. ही तुळस बहुगुणी आहे. याच्यात ऑक्सिजनच प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. सर्दी, खोकला, संसर्गाने झालेला खोकला, कफ घालवण्यासाठी तुळशीला पाने अतिशय उपयुक्त असतो. शिवाय तुळस प्रकृतीने थंड आहे.

आपण जो गुळवेल घेतला तो देखील प्रकृतीने थंड आहे. त्यामुळे तुम्हाला उष्णतेचा त्रास तुम्हाला होणार नाही. तुमची ऑक्सजन लेव्हल आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ही तुळस उपयुक्त ठरते. तुळशीचे दोन ते तीन पाने तुम्ही रोज चावून चावून देखील पाहू शकता. तर ही पाने यामध्ये कुस्करून टाकायची आहेत.

तिसरा जो पदार्थ पाहणार आहोत, ज्या लोकांना मुळव्याध आहे किंवा उष्णतेचा त्रास असेल त्यांनी घेऊ नका किंवा कमी प्रमाणात घ्या. बाकी सर्वजण हा पदार्थ घेऊ शकता. तो पदार्थ म्हणजे लसूण. लसणामध्ये अँटीबॅक्टरीयल प्रॉपर्टीस आहेत आणि याचा PH 14.5 आहे. सध्या 8.5 PH च्या पुढे असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला सगळे तज्ञ, डॉक्टर देत आहेत. लसूण आपल्यासाठी गुणकारी आहे.

जो विषाणू संसर्ग आहे तो कमी करण्यासाठी आणि लवकरात लवकर त्याचा खात्मा करण्यासाठी लसणाचे सेवन करणे गरजेचे आहे. म्हणून तीन ते चार पाकळ्या एका ग्लाससाठी घ्यायच्या आहेत. सगळा जो हा काढा तीन पदार्थांचा करतोय उकळी आल्यानंतर पुन्हा दहा मिनिटे उकळू द्यायचे आहे.

काढा करण्याची एक पद्धत असते आपण काय करतो काढा टाकतो आणि उकळी आली की लगेच काढून घेतो. तसं नाही तर तुम्ही एक ग्लास घेता त्याचं अर्धा ग्लास होईपर्यंत उकळू द्यायचं आहे. मित्रांनो हा काढा तुम्हाला दिवसातून दोन वेळेस घ्यायचा आहे. सकाळी घ्या, संध्याकाळी घ्या किंवा रात्री झोपताना घेतला तरी चालणार आहे. परंतु सध्याच्या या काळामध्ये हा काढा आपण घेतला पाहिजे. धन्यवाद.. मित्रानो हा व्हिडीओ पाहून काढा बनवू शकता == > https://www.youtube.com/watch?v=TiEH1ypivmc

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *