फक्त हे ५ दाणे, घसादुखी, घसा सुजणे, घशातील सुज, घसा बसणे रात्रीतून गायब…

घसा दुखी, घशाला सूज येणे, घासा बसणे एका रात्रीत गायब; फक्त या ग्रीन टी मुळे.
नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे. मंडळी सध्या संसर्गाचा काळ आहे. आणि या प्रतिकूल परिस्थिती मध्ये आपण आपले आरोग्य जपले पाहिजे. त्यासाठी आपल्याला थोडी जरी कोणत्या आजाराची लक्षणे वाटली तर, आपण दुर्लक्ष करू नये.

सध्या महत्वाचा आजार आहे तो म्हणजे घसा दुखी. कारण कोणत्याही आजाराची सुरूवात ही घसादुखी पासून होते. म्हणून घसादुखीच्या समस्येचा संपूर्ण नायनाट झाला पाहिजे. आणि घसादुखीवर उपचार झाला पाहिजे यासाठी आपण एक घरगुती उपाय पाहणार आहोत.

घसा दुखणे, घशात घवघव, घशात इन्फेक्शन किंवा घसा पूर्ण रीतीने कार्यक्षम नसणे किंवा घसा बसला असेल तर तो खुलण्यासाठी तर हा घरगुती उपाय नक्की करा. आज या घसादुखीच्या उपायासाठी एक ग्रीन टी करणार आहोत. आपल्याला कोणता काढा करायचा नाहीये.

फक्त दोन गोष्टी वापरून ही ग्रीन टी बनवणार आहे. हा उपाय खूप फायदेशीर आहे. यामुळे कोणत्याही प्रकारचे घशातील इन्फेक्शन बरे करता येणार आहे. या उपायासाठी फक्त पाच काळी मिरी घा. जास्त प्रमाण घ्यायचे नाहीये. घसा दुखी ही जी समस्या आहे त्याला सोअर थ्रोट असे म्हणतात.

घशाचा हा विकार ग्रुप ए स्ट्रेप्टोकोकल या संसर्गामुळे होतो. यामुळे घशातील पोकळी, घशातील गाठी तसेच स्वर यंत्रावर याचा परिणाम होतो. आणि यामुळे ताप येणे किंवा घसा बसणे किंवा स्वर यंत्रावर सूज येणे यासारखे प्रकार आपल्याला दिसतात. या सगळ्यांवर काळी मिरी उत्तम प्रकारे काम करते.

त्यासाठी या काळ्या मिरीची बारीक पावडर करून घ्या. यानंतर लागणारी दुसरी गोष्ट म्हणजे तुळशीची पाच पाने. ही तुळशीची पाने मिठाच्या पाण्यात धुवून घ्या. या पानांची पेस्ट करू शकता किंवा तशीच पाने वापरू शकता. या उपायासाठी एक ग्लास पाणी गरम करायला ठेवायचे आहे.

त्यामध्ये मिरी पावडर आणि तुळशीची पाने टाका. एक ग्लास पाणी पाऊण ग्लास होईपर्यंत उकळायचे आहे. जेणेकरून काळी मिरी व तुळशीच्या पानांचा पूर्णपणे अर्क पाण्यामधे उतरला पाहिजे. काळया मिरीमध्ये अँटीऑक्सीडंत प्रॉपर्टी असतात. जे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या व्हायरल इन्फेक्शन पासून दूर ठेवतात.

मित्रांनो हा तयार झालेला ग्रीन टी दिवसभरामध्ये तीन ते चार वेळा प्या. जर तुम्हाला जाणवले की तुमचा घसा दुखत आहे तर तुम्ही सकाळी उपाशीपोटी ,दुपारी व रात्री झोपण्यापूर्वी घ्या. हे पिल्यानंतर ३० मिनटे काही खायचे किंवा प्यायचे नाहीये. हे केल्याने एका रात्रीत घसा मोकळा होईल व कफ निघून जाईल. घशासंबंधी सर्व विकार व समस्या दूर होतात.

हा उपाय लहान मुलांपासून ते वयोवृध्द लोकांपर्यंत सर्वजण करू शकतात. हा उपाय खूप प्रभावी आहे. यामुळे कोणताही साईड इफेक्ट होणार नाही.१८ वर्षापेक्षा लहान मुलांनी प्रमाण थोडे कमी ठेवायचे आहे. असा हा अत्यंत उपयोगी उपाय आहे.हा उपाय आवडला तर गरजवंतापर्यंत नक्की पोहचवा. धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *