सध्या हा 1 तुकडा रोज वापरा, दुसरी लाट भयंकर आहे, कसलाही संसर्ग होणार नाही, छातीतील कफ जळेल…

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. मित्रांनो फुफ्फुस हा शरीरातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. फुफुसाची कार्यशक्ति ही आपल्या शरीराच्या प्रतिकार शक्ती वरती अवलंबून असते. ज्या व्यक्तींची प्रतिकारशक्ती कमी आहे ते या संक्रमणाचे शिकार होत आहेत. अशा व्यक्तींनी घाबरून न जाता योग्य आहार घेणे, आराम करणे व सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे.

या संक्रमणाला सामोरे जाताना घाबरून न जाता काही घरगुती उपाय करा. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. अंगावरती काढू नका. लवकरात लवकर दवाखान्यात गेल्याने पुढे होणारी हानी टाळू शकता. आपले कुटुंब सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येक व्यक्ती निरोगी राहणे गरजेचे असते. गर्दीमध्ये जात असताना त्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे गरजेचे असते.

एका व्यक्तीमुळे पूर्ण कुटुंबाला याचा त्रास सहन करावा लागतो. त्या व्यक्तीने बाहेर गेल्यानंतर योग्य अंतर ठेवणे तसेच मास्कचा वापर करणे अशा गोष्टींचे पालन केल्याने तुमचे कुटुंब सुरक्षित राहिल. जर काम करत असताना तुम्ही कोरोना पॉझिटिव व्यक्तींच्या संपर्कात आला तर, घरी आल्यानंतर काही घरगुती उपाय नियमित केले तर तुम्ही स्वतःला आणि तुमच्या कुटुंबाला संक्रमणापासून वाचवू शकता.

सध्याच्या या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सर्व डॉक्टर, अनेक सामाजिक कार्यकर्ते काम करत आहेत. हे काम करत असताना ते अनेक पॉझिटिव व्यक्तींच्या संपर्कात येतात. अशा व्यक्तींनी काळजी घेणे व घरी आल्यानंतर गरम पाण्याने अंघोळ करणे गरजेचे आहे. त्यासाठी या घरगुती उपायांमध्ये तुम्ही गरम पाण्यामध्ये एक चमचा मीठ टाकून गुळण्या केल्यास घसा मोकळा होतो.

अशावेळी घशाला जास्त इन्फेक्शन झाले असेल किंवा सूज असेल तर या मध्येच एक चमचा हळद टाकली तर घशाला असणारी सूज हळदीमध्ये असणाऱ्या अँटी बॅक्टेरियल घटकांमुळे कमी होते. प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हळद अत्यंत उपयुक्त ठरते. याही पदार्थाने तुम्ही गुळण्या केल्या तर तुमचा घसा चांगल्याप्रकारे साफ आणि मोकळा होतो.

यासोबतच मित्रांनो आज जो आपण उपाय पाहणार आहोत हा उपाय भरपूर व्यक्तींनी केलेला आहे. अनुभवसिद्ध असा हा उपाय आहे. या उपायासाठी लागणारा पदार्थ आहे तो म्हणजे “तुरटी”. तुरटी आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तुरटीचा वापर करताना विशेष काळजी घ्यायची आहे.

तुरटीचा जास्त प्रमाणात वास घ्यायचा नाही, तसेच तुरटीला हात लावला असेल तर तो डोळ्याला चोळू नका. डोळ्याला इजा होण्याची शक्यता असते. तुरटीचा वापर पाणी शुद्धीकरणासाठी केला जातो म्हणून आपल्या कुटुंबासाठी जो पाण्याचा हंडा भरून ठेवतो त्यामध्ये हा खडा सात ते आठ वेळा फिरवायचा आहे. आणि हे पाणी पिल्याने संक्रमणाचा धोका कमी होतो.

ज्या लोकांना घशाचे संक्रमण नको आहे किंवा झालेले आहे अशा व्यक्तींनी तुरटीचा वापर पुढीलप्रमाणे करायचा आहे. सुरुवातीला अर्धा ग्लास पाणी गरम करून घ्या. हे पाणी पूर्णतः उकळल्यानंतर तुरटीचा खडा पाच ते सहा वेळा म्हणजेच दहा सेकंद फिरवून घ्या. त्यानंतर तुरटीचा खडा बाजूला काढून ठेवा. त्यानंतर हे पाणी घशाला सहन होईल तिथे पर्यंत कोमट होऊ द्यायचे आहे.

असा हा उपाय जेवण केल्यानंतर अर्ध्या तासानंतर करायचा आहे. या पाण्याने गुळण्या करायच्या आहेत. असे केल्याने घशाचे इन्फेक्शन कमी होईल. तसेच कोणताही व्हायरस घशामध्ये राहणार नाही. सोबतच ज्या लोकांना दात दुखी आहे किंवा तोंडाचा वास येतो त्यांनी माउथ फ्रेशनर म्हणून वापर केला तरी चालतो.

घशाच्या संदर्भात हा उपाय अत्यंत रामबाण मानला जात आहे. सध्या बराच अशा व्यक्ती हा उपाय करतात. त्यामुळे बाहेरून घरी आल्यानंतर हा उपाय नक्की करा त्याचबरोबर आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *