संक्रमण जाणवताच, घराजवळील ५ पाने वापरा, दवाखान्यात जावे लागणारच ! छातीत कफ होणार नाही…

मित्रांनो सध्याच्या या संक्रमणाच्या काळामध्ये प्रारंभिक अवस्थेमध्ये तुम्हाला जर काही लक्षणे जाणवत असतील तर कृपया अंगावरती काढू नका. लगेच दवाखान्यात दाखवा. प्रारंभिक अवस्थेमध्ये लवकर दाखवल्याच्या नंतर मित्रांनो तुमची जी हानी होणार आहे ती हानी टाळू शकते

प्रारंभिक अवस्थेमध्ये दवाखान्यातील उपायाबरोबर काही घरगुती उपायांचा समावेश केला तर प्रतिकारशक्ती झटपट वाढते. सोबतच सर्दी, खोकला, पडसे लगेच कमी होतो. कितीही ताप असेल तर तो कमी करणारा आजचा एक घरगुती उपाय आहे. आयुर्वेदातील अँटीबायोटिक म्हणून या उपायाकडे पाहिलं जातं. अशा या उपायासाठी ज्या वनस्पती लागतात त्या सहज घरी उपलब्ध होतात. अशा या उपायासाठी कोणत्या वनस्पती लागणार आहेत हे सर्व आपण पाहुया.

पहिला पदार्थ लागणार आहे तो म्हणजे दालचिनी. दालचिनीची पावडर जर तुम्ही खाल्ली गेली तर ही पावडर मित्रांनो फुफ्फुसासाठी घातक ठरते. कारण फुफ्फुसामध्ये जळजळ होऊ शकते. पण ही जर पावडर तुम्ही काढ्याच्या स्वरूपात घेतली तर याचा अत्यंत फायदा होतो. म्हणून या उपायासाठी आपल्याला दालचिनी लागणार आहे.

दालचिनी अँटीबायोटिकचे काम करते. इन्स्टंट एनर्जी देण्यासाठी यामध्ये असणारे अँटीबॅक्टेरीयल घटक आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्याबरोबर आपल्या शरीरातील कफ कमी होण्यासाठी ही दालचिनी अत्यंत उपयुक्त ठरते. म्हणून ही दालचिनी बारीक करून अर्धा चमचा लागणार आहे

यानंतर दुसरा पदार्थ लागणार आहे ते म्हणजे पाणी. याचा आपल्याला काढा बनवायचा आहे. यासाठी दीड कप पाणी घ्यायचं आहे. अस हे दीड कप पाणी घेतल्यानंतर या दीड कप पाण्यामध्ये आपण जी दालचिनी बारीक केलेली आहे ही यामध्ये टाकायची आहे. यानंतर पुढचा घटक लागणार आहे ती म्हणजे हळद. अँटीबॅक्टरीयल घटक असणारी हळद आपल्या शरीरातील सूज कमी होण्यासाठी, घश्याचे इन्फेक्शन कमी होण्यासाठी छातीतील कफ कमी होण्यासाठी ही हळद यावर अत्यंत गुणकारी ठरते. म्हणून या उपायासाठी हळद लागणार आहे.

यानंतर पुढचा पदार्थ लागणार आहे ते म्हणजे तुळशीचे पान. प्रत्येक व्यक्तीच्या दारामध्ये तुळस असते. तुळस सर्वांनाच माहित आहे की आयुर्वेदामध्ये महत्त्वाचे स्थान असलेली तुळस, या तुळशीची सहा ते सात पाने लागणार आहेत. अशी ही सहा सात पाने धुतल्यानंतर यामध्ये कुस्करून टाकायची आहेत. अशी ही पाने यामध्ये कुस्करून टाकल्या नंतर पुढचा पदार्थ लागणार आहे अडुळसाची पाने.

अडुळसाची पाने साधारण पाच लागणार आहे. चांगल्या प्रकारे कुस्करून यामध्ये टाकायचे आहे. अडुळसा खोकला जाण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. हे सर्व पदार्थ खोकला, सर्दी, पडसे, अंगदुखी यावर गुणकारी ठरतात.

यानंतर पुढचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे गुळ. मिश्रणाची चव वाढवण्यासाठी, छातीतील कफ मोकळा होण्यासाठी गुळ अत्यंत उपयुक्त ठरतो. हे सर्व पदार्थ एकत्र करा, मंद गॅसवर उकळायला ठेवा. एक कप होईपर्यंत ये आपल्याला उकळून घ्यायचं आहे. परंतु ज्या व्यक्तीला सर्दी, पडसे, खोकला आहे त्या व्यक्तींनी इथपर्यंतच उपाय करायचा आहे.

यामध्ये तुम्ही सुंठही टाकू शकता. पण जर तुम्हाला ताप असेल अशा व्यक्तींनी सुंठीचा एक तुकडा आणि मिरे जे आहे ते दोन मिरे यामध्ये टाकायचे आहे. हे मिश्रण एक कप होईपर्यंत उकळू द्यायचं आहे. उकळून घेतल्याच्या नंतर हे जे मिश्रण आहे एक कप होईल. हा जो तयार झालेला काढा आहे

तो ज्या ही व्यक्तींना सर्दी, खोकला, ताप आहे त्या व्यक्तींनी हा काढा घ्यायचा आहे. काढा घेतल्याच्या नंतर लगेच अंगावरती साधारणतः पाच ते दहा मिनिटे घ्या. अंगामधून चांगल्या प्रकारे घाम निघेल. घाम निघल्याच्या नंतर ताप लगेच ओसरेल. दहा मिनिटात ताप कमी झाल्याचे तुम्हाला पाहायला मिळेल. तसेच सर्दी, खोकला, पडसेही याने कमी होईल. असा हा अत्यंत सोपा उपाय सकाळी उठल्याबरोबर एक वेळेस आणि संध्याकाळी झोपण्यापूर्वी एक वेळेस असा दोन वेळेस करा. असा हा उपाय करून पाहा. धन्यवाद..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *