कितीही भयंकर कफ मिनिटांत बाहेर फेका, कफ खोकला यावर घरगुती उपाय…

नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. तो महत्वाचा विषय म्हणजे छातीतील कफ बाहेर काढणे. अगदी काही मिनिटांमध्ये तुमच्या छातीतील सर्व कफ बाहेर निघेल.

तुम्हाला यासाठी कांद्याचा वापर करायचा आहे. सर्वांच्या घरांमध्ये कांदा हा असतोच, आणि जर नसेल तर आपण बाजारामधून उपलब्ध करू शकतो. अगदी सहजरीत्या मिळणारा एक कांदा वापरून तुमच्या छातीतील कफ रिकामा होईलच त्यासोबत खोकला किंवा ताप यावरती सुद्धा मात करता येईल.

घशाला किंवा स्वरयंत्राला सूज आली असेल तर खोकला येतो. काहीवेळा अपचनामुळे सुद्धा खोकला येतो. वातावरणामध्ये बदल झाला तर छातीमध्ये कफ साठतो. सध्याच्या आणिबाणीच्या परिस्थितीमध्ये कफ होऊ देऊ नका. आणि जर झालाच तर त्वरित कफ कसा नाहीसा करता येईल यासाठी हा घरगुती उपाय नक्की करा.

या उपायाचा कोणताही साइड इफेक्ट नाही. 100% आयुर्वेदिक असणारा असा हा उपाय नक्की करा. जर खोकला आला नाही तर तेसुद्धा शरीरासाठी घातक असते. म्हणून शस्त्रक्रिया झाल्यानंतर किंवा छातीला मार लागल्यानंतर किंवा निमोनिया मध्ये खोकला येत नसेल तर गंभीर परिस्थिती निर्माण होते. परंतु सध्याच्या या गंभीर परिस्थितीमध्ये खोकला येणे हे सुद्धा एक संकट आहे.

म्हणून छातीतील खोकला किंवा कफ त्वरित बाहेर काढणे यासाठी आपण घरगुती उपाय पाहणार आहोत. यासाठी आपल्याला कांद्याचे आवरण काढून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या. आणि हे छोटे-छोटे तुकडे मिक्सरला लावून त्याची पेस्ट तयार करून घ्या. मिक्सरमधून पेस्ट करून काढल्यानंतर त्यातील रस गाळून घ्या.

तुम्हाला हा कांद्याचा रस दीड ते दोन चमचा लागणार आहे. या रसामध्ये लिंबाचा रस देखील मिक्स करायचा आहे. साधारणता अर्धा चमचा लिंबाचा रस लागणार आहे. हे सर्व प्रमाण योग्य ठेवा. यामध्ये आणखी एक पदार्थ मिक्स करायचा आहे तो म्हणजे “शुद्ध मध”. कोणत्याही कंपनीचा असला तरी चालेल परंतु मध शुद्ध असावा. साधारणता एक चमचा मध टाका.

हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्‍स करा. हे तयार केलेले मिश्रण तुम्ही दिवसातून तीन ते पाच वेळा घेऊ शकता. हे द्रावण तुम्ही प्रत्येक वेळी नवीन करा. कांदा खोकल्यावर खूप गुणकारी आहे. तुमचा खोकला किंवा कफ त्वरीत मोकळा होईल. तुमची छाती मोकळी होईल. खोकल्याळे यामुळे होणाऱ्या सर्व अडचणींवर तुम्ही मात करू शकता.

या मिश्रणामध्ये एक ते दोन चमचे उकळलेले पाणी टाकले तरी चालेल. कांद्याच्या रसामध्ये नुसता मध जरी घातला तरी तुमचा कफ निघून जाणार आहे. कांद्याचा रस व लिंबाचा रस स्वतंत्रपणे घेऊन ज्यामध्ये उकळलेले पाणी टाकून दिवसातून तीन ते चार वेळा सेवन केल्यास देखील कफ मोकळा होतो.

मंडळी हा होता एकदम साधा सोपा व प्रत्येकाला घरगुती करता येणारा 100% आयुर्वेदिक उपाय. हा उपाय करा आणि खोकला व ताप यापासून नक्कीच दूर रहा. धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *