घशात खवखव करताच घराशेजारची ही 2 पान पाण्यात टाकून गुळणा करा, फुफुसात इन्फेक्शन जाणार नाही…

आपल्या घराशेजारीच असलेल्या या वनस्पतीच्या पानांनी करा व्हायरल इन्फेक्शनवर मात! नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. ऑक्सिजन हा आपल्या शरीरासाठी खुप महत्त्वाचा घटक आहे. आणि हा ऑक्सिजन आपल्या रक्तामध्ये मिसळण्याचे काम आपली फुफ्फुसे करत असतात.

परंतु जर आपल्या फुफ्फुसाला एखाद्या प्रकारचे इन्फेक्शन झाले तर ते इन्फेक्शन आपल्या शरीरात खूप वेगाने पसरते. त्यामुळे फुफ्फुसाच्या पेशी खराब होतात. खराब पेशींमधून चिकट द्रव बाहेर पडतो आणि यामुळे ऑक्सिजन शरीरामध्ये मिसळण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबली जाते.

त्यामुळेच आपल्याला कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शन पासून बचाव करायचा असेल तर, त्यावरचा महत्वाचा उपाय म्हणजे हे इन्फेक्शन फुफ्फुसांत जाऊ द्यायचे नाही. तुम्ही वारंवार घराभेर पडत असाल तर, तुम्हाला या संक्रमणाचा खूप मोठा धोका असतो.

कोणतेही व्हायरल इन्फेक्शन होत असताना ते सरळ फुफ्फुसांना होत नाही. तर ते आधी नाक तोंड आणि घष्यामार्गे आत जाते. हे इन्फेक्शन शरीरामध्ये जाण्यासाठी 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागतो. याच 3 ते 4 दिवसांमध्ये आपण जर योग्य उपाय केले तर, हे इन्फेक्शन किंवा संक्रमण आपल्याला टाळता येते. हे व्हायरस घशामध्ये नष्ट करणे हा या वरचा सर्वात उत्तम मार्ग आहे. आणि त्यासाठीच आजचा हा उपाय.

आपल्या घराशेजारी वनस्पती वापरून तुम्ही हा उपाय करू शकता. या वनस्पतीची पाने तुम्हाला वापरायची आहेत. ही वनस्पती दुसरी कोणती नसून ती आहे निलगिरी. खूप सहज रित्या आपल्याला याची पाने उपलब्ध होतात. पाने मिळत नसतील तर तुम्ही निलगिरी तेल वापरू शकता. निलगिरी कोणत्याही प्रकारच्या व्हायरल आजारा सोबत लढण्यासाठी खूप महत्वाचा घटक आहे.

श्वासनलिका आणि घशातील इन्फेक्शन नष्ट करण्यासाठी निलगिरी खूप उपयुक्त ठरते. या निलगिरीची 3 ते 4 पाने घ्या. तेल असेल तर ते 1 ते 2 थेंब तेल तुम्हाला घ्यायचे आहे. एक ते दीड ग्लास पाण्यामध्ये ही पाने उकळत घालायची आहेत. हे पाणी पूर्णपणे उकळून घ्यायची आहेत. या उकळलेल्या निलगिरीच्या पाण्याने तुम्हाला दिवसातून 3 ते 4 वेळा गरारे करायचे आहेत.

घशात याचा अर्क लागेपर्यंत या पाण्याने गरारे करायचे आहेत. या कोमट पाण्याने तोंड घसा आणि श्वासनलिका पुर्णपणे साफ होतील. यामुळे तुमच्या घाशमधील इन्फेक्शन पूर्णपणे नष्ट होईल. हे इन्फेक्शन पुढे फुफ्फुसांपर्यंत जाणार नाही. यामुळे पुढे होणारे अनेक आजार तुम्ही टाळू शकणार आहात. सर्दी खोकला इतका पण त्रास तुम्हाला जाणवणार नाही.

त्याचबरोबर जर तुमच्या घश्याला सूज आली असेल तर, तुम्ही हळदीच्या पाण्याचा वापर करा. किंवा हळद कोमट दुधामध्ये टाकून झोपण्याआधी हे दूध घ्या. हळदीमध्ये असलेल्या अँटी इन्फ्लामेट्री म्हणजेच सूज कमी करणाऱ्या घटकांमुळे घशातील सूज पूर्णपणे कमी होईल.

तर अशाप्रकारे फक्त निलगिरी च्या या पाण्याने गुळण्या किंवा गरारे केल्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन किंवा आजार होणार नाही. तुम्ही हा उपाय नक्की करा आणि आपल्या मित्रपरिवाराला देखील सांगा. घरी रहा काळजी घ्या. आरोग्य सांभाळा. धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *