जेवणाआधी हा पदार्थ, शरीरातील उष्णता, थकवा गायब, शरीर निरोगी आणि बलवान राहील, सांधेदुखी हाडांचे आजार गायब…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो तुमच्या शरीरामध्ये शक्तीची कमतरता असणे म्हणजे सतत थकवा जाणवणे, कमजोरी जाणवणे, शरीरामध्ये उष्णता जाणवणे, तोंडामध्ये उष्णते मुळे फोड येणे, उष्णतेमुळे इतर कोणताही त्रास असेल, त्याचबरोबर तुम्ही लगेच थकून जात असाल तर या सर्व समस्या आम्ही ज्या सांगणार आहे त्या उपायाने बऱ्या होतील. तसेच हाडांचे आजार, सांधेदुखी हे आजार सुद्धा या उपायाने बरे होतील. हा उपाय करण्यासाठी आपल्याच घरातील दोन ते तीन घटक लागतात.

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी सर्वात पहिला घटक आपल्याला लागतो गव्हाचे दूध. गव्हाचे दूध आपल्याला काढून घ्यायचे आहे. दूध कसे काढायचे तर एक वाटी मध्ये दोन ते तीन चमचे गहू घ्यायचे आहेत. हे गहू रात्री भिजत घालायचे आहे. रात्रभर हे गहू भिजल्यानंतर सकाळी हे गहू आपल्याला कुटून किंव्हा वाटून घ्यायचे आहे आणि त्या मध्ये पाणी मिक्स करून त्याचे दूध काढून घ्यायचे आहे.

हे जे दूध असत हे अत्यंत महत्वाच मानलं जातं. हे दूध मधुर, थंड, बलकारक, शक्तिवर्धक, असत, त्याचबरोबर पौष्टिक आणि आरोग्य दृष्ट्या खूपच महत्वाचं असत. यामध्ये पोटॅशियम, प्रोटीन, मिनरल्स, मॅग्नेशियम, फॉस्फरस, असे उपयोगी घटक या मध्ये असतात. अशा गव्हाचे दूध आपल्याला एक वाटी काढून घ्यायचे आहे.

या दुधामध्ये दुसरा घटक आपल्याला मिक्स करायचा आहे तो म्हणजे खडीसाखर पावडर. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी खडीसाखर नाही वापरली तरी चालेल. खडीसाखर थंड असते त्यामुळे उष्णतेचा त्रास शरीरातून निघून जातो. म्हणून एक चमचा खडीसाखर पावडर आपण या मध्ये टाकायची आहे.

तिसरा जो घटक आपल्याला या मध्ये टाकायचा आहे तो म्हणजे जिरे. जिरे हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. हलके भाजून घेऊन त्याची बारीक पूड करायची आहे. जिऱ्या मध्ये व्हिटामिन E हे जीवनसत्त्व असत जे केस, त्वच्या, चांगली करण्यासाठी मदत करत. त्याचबरोबर जिऱ्यामध्ये अँटीऑक्सिडंट असत. ज्यामुळे तुमचं पचन चांगलं होत. जिरे वायुनाशक, पाचक, डोकेदुखीचा त्रास कमी करणारे असतात. उष्णतेचा त्रास कमी करणारे हे जिरे असतात. म्हणून एक चमचा जिऱ्याची पूड या आपल्याला या मध्ये टाकायची आहे.

या मिश्रणाला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. सकाळी उपाशी पोटी आपल्याला हे प्यायचे आहे. सलग 10 ते 11 दिवस हा उपाय करायचा आहे. हा प्रचंड थंड पदार्थ तयार होतो आणि त्यामुळे उष्णतेचा त्रास शरीरामधून निघून जातो.

अत्यंत ताकदीचा आणि शक्तिवर्धक असा या पदार्थ तयार होतो. हा उपाय फक्त गर्भवती महिलांनी करायचा नाही बाकी सर्वांनी केला तरी चालतो. जे आपण गव्हाचे दूध घेणार आहे ते आपण दररोज नवीन बनवायचे आहे. उपाय आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *