या एका वस्तूच्या सेवनाने थायराइड होईल मूळापासून नष्ट- लवकर जाणून घ्या उपाय…

जेव्हा कोणी व्यक्ति थायराइड या आजाराने ग्रस्त असते, तेव्हा थायराइड ग्रंथी व्यवस्थित काम करीत नसल्यामुळे रक्तात असलेले थायराक्सिन नावाच्या हार्मोन्सच्या स्तरावर प्रभाव पडतो. या प्रभावाचे दोन विभाग असतात, हायपरथायराइडिज्म आणि हायपोथायराइडिज्म. आज आम्ही तुम्हाला थायराइड पासून वाचण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत.

अळशी आहे प्रभावशाली: आजच्या धावपळीच्या कालावधीमध्ये अनियमित खाणे पिणे असते, त्यामुळे नकळत आपण कितीतरी घातक आजारांना आपल्या शरीरात आमंत्रण देत असतो. अशा वेळी आपल्या आहारात एक छोटीशी वस्तु जर आपण रोज घेतली तर आपण स्वत:चा बचाव नक्की करू शकतो.

आम्ही बोलतो आहोत, अळशीबद्दल जी पोषक तत्वांचे भांडार आहे. कितीतरी आजारांपासून ती आपल्याला वाचवू शकते. थायराइड नावाच्या आजारापासून सुटका होण्यासाठी अळशी एक खूपच चांगला उपाय आहे. अळशीमध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा-३ फैटी अॅसिड आढळते.

हे अॅसिड थायराइड ग्रंथीचे काम सुरळीत करण्यासाठी प्रमुख भूमिका बजावते. जे लोक हायपोथायराइडिज्मने पीडित असतात, त्यांनी अळशी आणि अळशीचे तेल याचा वापर जरूर केला पाहिजे.

अक्रोड: अक्रोड थायराइडचा नाश करण्यास मदत करते. सीफूड व्यतिरिक्त काळ्या अक्रोडलासुद्धा आयोडीनचा सगळ्यात चांगला स्त्रोत मानला जातो. थायराइडच्या समस्येमध्ये आयोडीन एक आवश्यक पोषक तत्व आहे, जे थायराइड ग्रंथीचे स्वास्थ्य आणि काम याला सुरळीत करण्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावते.

मुलेठी : मुलेठीचे मूळ म्हणजेच जेष्टीमध ही बहुगुणी औषधी वनस्पति आहे. याचे मूळ औषधी आहे. याला मुलेठी असेही म्हणतात. या वनस्पति दक्षिण युरोप व आशिया खंडात आढळतात. याचे झाड ६ फुट उंचीचे असते. हे लंबगोलाकार, पिवळसर लाल रंगाचे असते.

मुलेठीचा म्हणजेच त्याचे मूळ जेष्टीमध याचा उपयोग नेहमी खोकल्यामध्ये केला जातो. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की मुलेठी थायरइड ग्लॅंड मध्ये संतुलन ठेवण्याचे काम करते. यामुळे थायराइड पीडित लोकांची थकावट उर्जेमध्ये बदलून जाते. त्याशिवाय, मुलेठीमध्ये आढळणारे ट्रीटरपेनोइड ग्लाइसेरिथेनिक अॅसिड खूपच आक्रमक असते, जे थायराइड कॅन्सर पेशींना वाढण्यापासून थांबविण्यात मदत करते.

गहू: गव्हामध्ये अनेक औषधी आणि रोग निवारक गुणधर्म असतात. गहू रक्त आणि रक्ताभिसरण यासंबंधीचे आजार, रक्ताची कमतरता असणे, उच्च रक्तदाब असणे, सर्दी, अस्थमा, ब्रोंकाइटीस, साइनस आणि थायराइड ग्रंथीसंबंधी आजारात खूपच उपयोगी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *